सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच, मुंबई महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र औरंगाबाद व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, औरंगाबाद आणि गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरीता त्यांना मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधनांचे वाटप करण्याकरिता दिनांक २० एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गांधी भवन, सावरकर चौक, समर्थनगर, औरंगाबाद येथे श्रीमती ज्योती राठोड, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद श्री. पावरा, वै. सा. का., समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, औरंगाबाद ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. राजाभाऊ गोकूळ अष्टमे, श्री. विजय कान्हेकर, महात्मा गांधी सेवा संघ यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांगाची मोफत तपासणी व नांव नोंदणी करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये व्हिलचेअर, श्रवणयंत्र, कुबडीजोडी. एम.आर.कीट, इत्यादी करीता नांव नोंदणी तर जयपुर फुट कॅलिपर. एफ ओ. के. एफ, ओ. इत्यादी असे ११२ दिव्यांगाचे मोफत तपासणी करण्यात आली आहे. नांव नोंदणी व तपासणी केलेल्या दिव्यागांना नजिकच्या काळात साहित्य व सहाय्यभुत साधने देण्यात येतील. त्याचबरोबर जे दिव्यांग या लाभापासून वंचित आहेत त्यांना गांधी भवन, समर्थनगर, औरंगाबाद येथे मोफत तपासणी व नांव नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संजोयकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ०२४०-२३४५७५५/५२