लॉक डाऊन च्या काळात सर्व शाळा बंद असल्याने शालेय शिक्षणाची दुरावस्था झाली आहे. तसेच सर्व पालकांमध्ये COVID-19 च्या तिसऱ्या लाटेच्या संधर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे.तसेच सर्व पालक व विद्यार्थी यांनी संभाव्य डेल्टा प्लस या कोरोना व्हायरस पासून सावध होने आवश्यक असल्याने व त्यासोबत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेणे ही तेवढेच महत्त्वाचे असल्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व ज्ञानज्योत विद्यालय, जालना व जेम्सस्टोन वर्ल्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने Covid-19 व मुलांचे आरोग्य या विषयावर खास विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
या ऑनलाइन वेबिनार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब बायस साहेब होते तर यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई , विभागीय कार्यालय औरंगाबाद चे अध्यक्ष चे अध्यक्ष श्री अंकुशराव कदम,सचिव श्री निलेश राऊत व कार्यकारणी सदस्य मा. सुहास तेंदुलकर साहेब व संघटक माननीय सुबोध जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबत प्रमुख व्याख्याते म्हणून मा. श्री डॉ तुषार शिंदे, प्रसिध्द़ बालरोग तज्ञ, शिंदे हॉस्पीटल, जालना हे उपस्थित होते.
मा. श्री डॉ तुषार शिंदे यांनी कोविड कालखंडातील लहान मुलांचे मानसिक आरोग्य़ व कोविड प्रादुर्भावापासुन त्यांचा बचाव कसा करावा या बाबत माहिती दिली . यावेळी पालक व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थी व पालकांच्या विविध प्रश्नाबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी श्रीमती मंजुषा बायस, सचिव ज्ञानज्योत शिक्षण संस्था जालना, श्री संजय सरकटे मुख्याध्यापक ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालय जालना, श्री कुंदन नेमाडे प्राचार्य जेमस्टोन वर्ल्ड स्कूल जालना, श्री निलेश हिवाळे मुख्याध्यापक ज्ञानज्योत प्राथमिक विद्यालय जालना तसेच श्री शरद मांटे मुख्याध्यापक मंदिर प्राथमिक विद्यालय ढवळेश्वर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नीलिमा आरोटे . तर प्रास्ताविक श्री किशोर खरात व आभार श्री कल्याण खराबे यांनी मानले. यावेळी ऑनलाईन कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी व पालकांनी उपस्तीथी लावली ही बाब मात्र कौतुकास्पद होती.