आपण त्यासाठी आपले निरीक्षण व अनुभव समृद्ध करायला हवे. महाविद्यालयीन नियतकालिक त्या लिखाणाची सुरुवात करण्याची योग्य संधी आहे. त्यातून आपण अभिव्यक्त व्हावे, असे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१८ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मानवत जि. परभणी येथील के.के.एम महाविद्यालयास यंदाचा उत्तेजनार्थ पुरस्कार या स्पर्धेत मिळाला आहे , त्याच्या वितरण प्रसंगी लोमटे बोलत होते. मा. आसाराम लोमटे यांच्या हस्ते महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रूवार , सचिव बालकिशन चांडक , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे , प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ , परभणी केंद्राचे सचिव विजय कान्हेकर , नांदेड केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे , अंकाच्या संपादक डॉ.शारदा राऊत , डॉ.दुर्गेश रवंडे , प्रा.अनंत मोगल याप्रसंगी उपस्थित होते. नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत यांनी याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.