नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सोमवार, दि. ७ जानेवारी रोजी सायं. ६ वा. प्रोझोन मॉल,औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, भारत सरकार, पुणे यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांची १५० वी जयंती,जागतिक ख्यातीचे स्वीडिश दिग्दर्शक इगमान बर्गमन,मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज पु.ल.देशपांडे, ग दि माडगुळकर,सुधीर फडके तसेच हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील महान कलावंत संगीतकार नौशाद,संगीतकार स्नेहल भाटकर, गीतकार कैफि आझमी आणि मझरूह सुल्तानपुरी, पार्श्वगायिका शमशाद बेगम यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या मोजक्या चित्रपटांची पोस्टर्स या प्रदर्शनात त्यांच्या विषयी आदरांजली म्हणून मांडली जाणार आहे.या शिवाय नुकतेच ज्यांचे निधन झाले ते जागतिक कीर्तीचे भारतीय दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या चित्रपटांची पोस्टर्स प्रदर्शनात असणार आहेत. सदरील प्रदर्शन दि १३ जानेवारी पर्यंत प्रोझोन मॉल येथे सुरू राहील. या प्रदर्शनाचे उद्घाटन औरंगाबाद आंतरऱाष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या संयोजन समितीचे अध्यक्ष मा. नंदकिशोर कागलीवाल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष मा. अंकुशराव कदम व फेस्टिव्हलचे संचालक मा. अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रोझोनचे सेंंटर हेड मा. मोहम्मद अर्शद,मा. भालचंद्र कांगो, सुजाता कांगो,एमजीएम फिल्म आर्टस् चे प्रमुख शिव कदम,डॉ.आनंद निकाळजे,डॉ.मुस्तजीब खान,महेश देशमुख,मनोज तुळपुळे,किशोर निकम, जाई देशमुख, नीता पानसरे, योगिता महाजन,नीना निकाळजे,प्रा.अनिलकुमार साळवे, पवन गंगावणे, आयनॉक्सचे दशरथ खजिनदार,अविनाश रावते, ऍड.स्वप्नील जोशी, योगेश इरतकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होते. औरंगाबादच्या रसिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.