समाज समृद्धीची वाट ग्रंथालयातून जाते पुस्तक वाचनामुळे समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेतो समृद्ध ग्रंथालये हीच भविष्यातील उन्नत आणि प्रगत समाज घडवतील यासाठी वाचकांना जलद व आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई जिल्हा केंद्र अहमदनगर व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने भेंडा तालुका नेवासा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात आयोजित ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रंसगी ते बोलत होते यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राचे सचिव भाऊसाहेब सावंत ,मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची कामगार संचालक सुखदेव फुलारी ,माजी प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड , आण्णासाहेब खाटीक व्यासपीठावर उपस्थित होते संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब आरगडे यांनी प्रास्ताविक केले . श्री . शिंदे बोलताने पुढे म्हणाले की , पुस्तक देवदेव , वार्षिक अहवाल व वेळोवेळी शासनाने ग्रंथालया संदर्भात मागीतलेली माहिती , वाचकांना ग्रंथ तत्काळ उपलब्ध करुण देण्यासाठी ई - ग्रंथालय प्रणाली उपयुक्त आहे . या प्रणालीचा वापर सर्व ग्रंथालयांनी करून वाचकांना जलद सेवा उपलब्ध करून द्यावी व वाचन संस्कृती जोपासावी . याप्रसंगी नेवासा जिल्हा ग्रंथालय निरिक्षक रामदास शिंदे यांनी प्रोजेक्टरद्वारेऑनलाईन वार्षिक अहवाल भरण्याचे प्रशिक्षण दिले .तालुक्यातील ग्रंथपालांनी ३५संगणकावर ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचे प्रात्यक्षिक केले ग्रंथपाल पोपट उगले यांनी आभार मानले तालुक्यातील सर्व ग्रंथालयाचे ग्रंथपाल व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .