खालील लिंकवर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करून भरावा व त्यांची प्रिंट काढून ग्रंथपाल अथवा संदर्भ अधिकारा-याकडे जमा करावा.
क्रमांक | नाव | किंमत |
---|---|---|
१ | यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ / यशवंतराव चव्हाण (Soft Copy) | १९० |
२ | यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ (Hard Copy) | ३०० |
३ | Krishnakath / Yaswantrao Chavan | ३९५ |
४ | यशवंत चितंनिका | २५ |
५ | यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार / महानोर ना. धो. | १० |
६ | सह्याद्रीचे वारे / यशवंतराव चव्हाण | २२५ |
७ | यशवंतराव चव्हाण यांची विधीमंडळातील निवडक भाषणे खंड १ | २५० |
८ | Selected Speeches in the State Legislature / Khobrekar, V. G | ३०० |
९ | यशवंतराव चव्हाण जीवनप्रवाह फोटो अल्बम / प्रधान राम | ६५० |
१० | Y. B. Chavan A. Pictoral Biography / Pradjan R. D | ८५० |
११ | भूमिका यशवंतराव चव्हाण | ३०० |
१२ | यशवंतराव चव्हाण की आत्मकथा कृष्णातीरे | ३०० |
१३ | आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार : यशवंतराव चव्हाण / कदम के. जी | २५० |
१४ | ऋणानुबंध – यशवंतराव चव्हाण | ३०० |
१५ | न्यायाच्या प्रतीक्षेत / अँड. आग्रे सतोष | २०० |
१६ | सरंक्षण सिद्धता / देशपांडे अ. पा. | १०० |
१७ | सह्याद्रीचा सुपुत्र / डॉ. जोशी न. म. (मराठी ) | २५ |
१८ | सह्याद्रीका सुपुत्र / डॉ. जोशी न. म. (हिंदी ) | २५ |
१९ | Son of Sahyadri / Dr. N. M. Joshi | २५ |
२० | डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ एक मागोवा / चव्हाण रा. ना. | ३५० |
२१ | राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य | २२५ |
२२ | ग्रामिण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे / चव्हाण रा. ना. | ३२० |
२३ | अक्षरवेध | २५० |
२४ | जाणता राजा यशवंतराव चव्हाण / जाधव मयूर | २०० |
२५ | Yaswantrao Chavan in Reffects On India Society and Polities/ Lele, Jayant | ७५० |
२६ | कथारुप यशवंतराव / लोखंडे, नवनाथ | ३५० |
२७ | प्रबोधनाची क्षितिजे समाज प्रबोधन व परिवर्तन – ऐतिहासिक चिंतन | २२५ |
२८ | सकलजन संवाद / रा. ना. चव्हाण | ३५० |
२९ | शेतिनिष्ठ यशवंतराव / डॉ. ठोंबरे शिवाजीराव | २०० |
३० | यशवंतराव चव्हाण सुसंस्कृत नेतृत्वाचे घराणे | १५० |
३१ | महर्षी विठ्ठल रामजी शिंदे संस्थापित ब्राह्मसमाज, वाई एक ऐतिहासिक दुष्टीक्षेप / रा. कृ. बाबर | २०० |
३२ | रा. ना. चव्हाण याचे विश्व विचार / गुंदेकर, श्रीराम | ३५० |
३३ | संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार एक अभ्यास / चव्हाण, रा. ना. | ३५० |
३४ | लोकराजा शाहू छत्रपती / डॉ. जाधव, रमेश | ४०० |
३५ | माझ्या विद्यार्थी मित्रानों.. स्व. यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील माझ्या | ३९५ |
३६ | यशवंतराव चव्हाण / पाटोळे भावना | २२५ |
३७ | श्री. शरद पवार यांचे आत्मचरित्र "लोक माझे सांगाती" | ३८० |
३८ | शिवचरित्र प्रदीप / आपटे, द. वि. | २५० |
३९ | दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ते ४ मूळ संपादक- खरे, ग.ह./ देशपांडे, ब्रह्मानंद | ७५० |
४० | यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण / चव्हाण रा. ना. | १६० |
४१ | Y.B. Chavan : Life & Times / Talwalkar Govind | १२५० |
४२ | महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन परिसंवाद / शिंदे अण्णासाहेब | २०० |
४३ | यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व व कर्तृत्व / तळवलकर गोविंद | ५०० |
४४ | The Bountiful Banyan Abigraphy of Karmaveer Bhaurao Patil / Patil, P. G | २०० |
४५ | महेश एलकुंचवार परिसंवाद आणि मुलाखत / यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान | १५० |
४६ | संशोधकाचा मित्र / खरे, गणेश हरी | १५० |
४७ | यशवतराव चव्हाण : समग्र साहित्य सूची / पाटील, वि. वि. | १५० |
४८ | जोशी काका / मा. देशपांडे (बापू) | २०० |
४९ | दूरदर्शी शिक्षणयोगी / जे. पी. नाईक | २०० |
५० | यशवंत स्मृतिसुगंध / जोशी रामभाऊ | २०० |
५१ | तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्र जोशी / रा. ना. चव्हाण | २५० |
५२ | अस्मिता महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण / ठोके, रा. ना. | २०० |
५३ | शब्दाचे सामर्थ्य-यशवंतराव चव्हाण यांचे लेख, साहित्य व भाषणे / प्रधान राम | ३७५ |
५४ | यशवंतराव चव्हाण विविधांगी व्यक्तीमत्त्व / वि. वि. पाटील | १०० |
५५ | कृष्णाकाठ या आत्मचरित्र पुस्तकाच्या (ऑडिओ सीडी ) | १०० |
५६ | न्यायलीन व्यवहार आणि मराठी भाषा | ४०० |
५७ | Handbook For Senior Citizen / Yashwantrao Chavan Pratishthan | ३५ |
५८ | Debacle to Resurgence Y. B. Chavan Defence Minster (1962/66) / Pradhan, R. D. | ६९५ |
५९ | Winds of The Sahyadri Select Speeches of Yashwantrao Chavan / Yashwantrao Chavan Pratishthan | ३७५ |
६० | नवभारत : परिवर्तनाची दिशा कार्ले शिबिर परिसंवाद / पाटील. वि. वि. | ७५ |
६१ | महाराष्ट्रातील चार दशकातील वाटचाल | |
६२ | यशवंतराव एक इतिहास / जोशी रामभाऊ | ६४० |
६३ | थोरले साहेब / पाथ्रीकर, विजय | ३५० |
६४ | Footprints of Culture / Bhosele, D. T. | २५० |
६५ | Selected Speches in the State Legislature Khobrekar, V. G. | ३०० |
६६ | Parliamentary Privileges Judiciary and the Press | १३० |
ग्रंथालयाविषयी माहिती
जगातील ज्ञानामध्ये दरवर्षी भर पडत आहे. त्यामुळे ग्रंथ, ज्ञान साधने मोठ्या संख्येने प्रसिद्ध होत आहेत. ग्रंथालयातील वाचक वर्गाचे समाधान होण्यासाठी आपण तशा प्रकारच्या ग्रंथालयातून सेवा दिल्या जातात. गेल्या वीस वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झेप घतेली आहे. या क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन झाले आहे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. सध्या सर्वत्र ग्रंथालयाचे व माहिती केंद्रे स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर स्थापन झाली आहेत. ती ज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शास्त्रीय व इतर संशोधनाचा वेगाने विकास होत आहे.
ग्रंथप्रेमी मा. यशवंतराव चव्हाण यांची पुस्तके विक्रीकरिता ठेवण्यात आली आहेत. ग्रंथालयाने कांही महत्त्वाच्या विषयाची वृत्तपत्रीय कात्रणे वाचकांना हाताळता यावी याकरिता व्यवस्थित बांधणी करुन ग्रंथालयामध्ये संदर्भाकरिता ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी, संशोधक यांच्याकरिता अद्यावत माहितीकरिता नियतकालिकांची बांधणी करुन संदर्भाकरिता ठेवली आहेत. ग्रंथालयात विविध नियतकालिके, समाजशास्त्र, शेती, इतिहास, कायदा, संस्कृती इ. विषयांवरील पुस्तके, आत्मचरित्रे, धर्मकोश, विश्र्वकोष, गॅझीटीयर, अटलास, इअरबुक, डिक्शनरी, निरनिराळ्या कायद्याचे ग्रंथ उपलब्ध आहेत. वेळोवेळी ग्रंथालयाला अनुसरुन नवीन पुस्तके खरेदी करण्यात येतात. ग्रंथालयीन नियमानुसार ग्रंथालयाची मांडणी केली आहे. ग्रंथालयाचा वाचकाकरिता जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच पुस्तके शोधण्याकरिता मशीन कॅटलॉगच्या सहाय्याने वाचकांना मदत होते. डिडिसी-२३ (डेव्ही डेसियल क्लासीफिकेशन) नुसार ग्रंथाचे वर्गीकरण केले आहे. मुख्य वर्गांक आणि त्याचे उपवर्ग यानुसार ग्रंथाची मांडणी केलेली आहे. सर्व ग्रंथ याच पद्धतीप्रमाणे कपाटात ठेवण्यात आले असून त्यामुळे संगणकीय सहाय्याने साहित्य शोध जलद गतीने व अचूक घेता येतो. विशेष ग्रंथालयीन नेटवर्क उदा. डेलनेटच्या माध्यमातून ऑनलाईन ग्रंथालयीन सेवा दिली जाते.
ग्रंथालयाचे नियम
यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाचे सभासद होण्याकरिता नमुना अर्ज तयार केला आहे. या अर्जामध्ये स्वत:च्या हस्ताक्षरात परिपूर्ण माहिती भरून त्यासोबत पुढीलप्रमाणे वर्गणी भरणे आवश्यक आहे.
अ) सर्वसाधारण सभासद :
सर्वसाधारण सबासदाकरिता रु. २५०/- वार्षिक वर्गणी तसेच रु. २५०/- अनामत रक्कम ( १९९६ पासून )
ब ) विद्यार्थी सभासद :
महाविद्यालयीन / उच्चशिक्षण / संशोधक विद्यार्थ्यांकरिता वार्षिक रु. ५०/- नाममात्र वर्गणी व अनामत रक्कम रु. १००/- ( दि. १-८-०८ पासून )
क) यशवंतराव चव्हाण ग्रंथालयामध्ये संदर्भाकरिता काही विद्यार्थी एक आठवडा, एक महिना या कालावधीकरिता ग्रंथालयाचा लाभ घेतात. या विद्यार्थ्यांकडून रु. ५०/- एका आठवड्याला व एक महिन्याला फी आकारण्यात येते. त्यांच्याकडून फक्त एका कार्डवर त्यांची वैयक्तिक माहिती भरून घेण्यात येते.
ड) माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी शिक्षण घेणारे विद्यार्थी संगणकविषयक पुस्तकांचा लाभ घेतात. त्याकरिता ग्रंथालय वेगळी फी आकारत नाही.
इ-१) संयुक्त संस्था सभासदत्व
कार्पोरेट या शब्दाच्या व्याख्येत बसणारी संस्था या सभासदत्वासाठी पात्र असेल. एकावेळची वर्गणी रु. ५०,०००/-, ५ वर्षासाठी.
अनामत रक्कम :
सर्वसाधारणपणे अनामत रक्कम घेण्यात येणार नाही. परंतु एखाद्या दुर्मीळ व किंमती पुस्तकासाठी प्रतिष्ठान निश्चित करेल तेवढी रक्कम घेण्यात येईल.
एका वेळी देण्यात येणारी पुस्तके : एकावेळी जास्ती जास्त १० पुस्तके देता येतील.
इ-२) संस्था सभासदत्व
यासाठी शिक्षण व संशोधन संस्था व सांस्कृतिक संस्था पात्र राहतील. परंतु शिक्षण व संशोधन संस्था ही युजीपी आय. सी. एस. एस. आर., आय. सी. सी. आर. किंवा आय. सी. एच. आय. यांच्याकडून मान्यता प्राप्त झालेली असावी, तर सांस्कृतिक संस्था ही महाराष्ट्र शासन केंद्र शासन किंवा मान्यता प्राप्त अधिघोषित विद्यापीठ यांनी मान्यता दिलेली असावी.
संस्था सभासदत्वासाठी :
प्रवेश फी रु. १,०००/- ना परतावा वार्षिक वर्गणी : रु. ५,०००/-
दीर्घ कालावधीसाठी संस्था सभासद : एकावेळी ५ वर्षासाठी वर्गणी रु. २०,०००/-
एकावेळी देण्यात येणारी पुस्तके : एकावेळी जास्तीत जास्त १० पुस्तके देण्यात येतील.
इ-१, व इ-२ येथील सभासदत्व हे संबंधित संस्थेच्या प्रमुखास देण्यात येईल. त्यांना ग्रंथालयाचे ओळखपत्र देण्यात येईल. संस्थेच्या प्रमुखास आवश्यक वाटल्यास ते त्यांच्या एक किंवा दोन कर्मचा-यांना त्यांच्या वतीने पुस्तके घेण्यास/परत करण्यास नामनिर्देशित करु शकतील. नामनिर्देशन अधिकृत पत्राने करावे लागेल. मात्र पुस्तके अबाधितपणे वेळेवर परत करणे व ग्रंथालयाच्या नियमांचे पालन करणे यांची जबाबदारी संस्था प्रमुखांची असेल. वरील सभासदत्व देण्याचा किंवा कारण न देता नाकारण्याचा पूर्ण अधिकार प्रतिष्ठानला राहील.
सर्वसाधारण सभासद :
सभासदांना एकावेळी एक पुस्तक / ग्रंथ देण्यात येईल व ते आठ दिवसात परत करणे आवश्यक आहे. तसेच संदर्भ ग्रंथाचा उपयोग ग्रंथालयातच करता येईल. संदर्भ ग्रंथ घरी नेता येणार नाही. पुस्तकाची किंमत भरलेल्या अनामत रकमेपेक्षा जास्त असेल तेव्हा अधिक अनामत रक्कम किंवा त्या पुस्तकांच्या किमतीएवढी अनामत रक्कम भरून पुस्तक घरी नेता येईल.
महाविद्यालयीन व उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी/संशोधक यांना ग्रंथ, संदर्भग्रंथ, नियतकालिके ग्रंथालयात बसून वाचण्यासाठी / संदर्भासाठी देण्यात येतात. घरी/ग्रंथालयाबाहेर नेण्याकरिता देण्यात येणार नाही.
ग्रंथालयाच्या वेळा व सुट्टया :
सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ग्रंथालय वाचकांकरिता तसेच पुस्तके परत करणे/नवीन घेणे यासाठी उघडे राहील. तसेच ऑगस्ट २०११ पासून दुसरा व चौथा शनिवार, सर्व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ग्रंथालय सुरु ठेवण्यात आले आहे.
सभासदाचे कार्ड हरिवल्यास त्यांना पुस्तक /ग्रंथ देण्यात येणार नाही. सभासदत्त्व नियमित ठेवण्याकरिता, सभासदाने स्वत:च्या हस्ताक्षरात साध्या कागदावर अर्ज करून ग्रंथालयास सादर करावा, त्यानंतर कार्डाची दुसरी प्रत देण्याचा विचार केला जाईल.
सभासदांकडून ग्रंथ हरविल्यास त्यांनी १५ दिवसांत त्यांनी नवीन खरेदी करून द्यावा लागेल किवा त्या ग्रंथाची अद्यावत रक्कम मूल्याइतकी रक्कम अनामत रक्केमधून वळती करण्यात येईल व गरज पडल्यास अधिकची रक्कम सभासदास भरावी लागेल. अनामत रक्कमेतून रक्कम भरणे अनिवार्य राहील.
सभासदांनी घरी नेलेले पुस्तक खराब केल्यास / वाचण्याच्या स्थितीत नसल्यास वा पाने फाटलली आढळल्यास सभासदांनी वरीलप्रमाणे नवी पुस्तक आणून देणे किंवा रक्कम भरणे अनिवार्ण राहील.
ग्रंथालयाचे नियम
यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाचे सभासद होण्याकरिता नमुना अर्ज तयार केला आहे. या अर्जामध्ये स्वत:च्या हस्ताक्षरात परिपूर्ण माहिती भरून त्यासोबत पुढीलप्रमाणे वर्गणी भरणे आवश्यक आहे.
अ) सर्वसाधारण सभासद :
सर्वसाधारण सबासदाकरिता रु. २५०/- वार्षिक वर्गणी तसेच रु. २५०/- अनामत रक्कम ( १९९६ पासून )ब ) विद्यार्थी सभासद :
महाविद्यालयीन / उच्चशिक्षण / संशोधक विद्यार्थ्यांकरिता वार्षिक रु. ५०/- नाममात्र वर्गणी व अनामत रक्कम रु. १००/- ( दि. १-८-०८ पासून )क) यशवंतराव चव्हाण ग्रंथालयामध्ये संदर्भाकरिता काही विद्यार्थी एक आठवडा, एक महिना या कालावधीकरिता ग्रंथालयाचा लाभ घेतात. या विद्यार्थ्यांकडून रु. ५०/- एका आठवड्याला व एक महिन्याला फी आकारण्यात येते. त्यांच्याकडून फक्त एका कार्डवर त्यांची वैयक्तिक माहिती भरून घेण्यात येते.
ड) माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी शिक्षण घेणारे विद्यार्थी संगणकविषयक पुस्तकांचा लाभ घेतात. त्याकरिता ग्रंथालय वेगळी फी आकारत नाही.
इ-१) संयुक्त संस्था सभासदत्व - कार्पोरेट या शब्दाच्या व्याख्येत बसणारी संस्था या सभासदत्वासाठी पात्र असेल. एकावेळची वर्गणी रु. ५०,०००/-, ५ वर्षासाठी.
अनामत रक्कम : सर्वसाधारणपणे अनामत रक्कम घेण्यात येणार नाही. परंतु एखाद्या दुर्मीळ व किंमती पुस्तकासाठी प्रतिष्ठान निश्चित करेल तेवढी रक्कम घेण्यात येईल.
एका वेळी देण्यात येणारी पुस्तके : एकावेळी जास्ती जास्त १० पुस्तके देता येतील.