शुभदा देशमुख

यशस्विनी सामाजिक सन्मान
गडचिरोली
2022

गडचिरोली जिल्ह्यात असलेलं कुरखेडा हे गाव आपलं कार्यक्षेत्र, नक्षलवाद्यांच्या रेड कॉरिडॉरची साक्ष देणारी शांतता! साने गुरुजींच्या पुस्तकांचा आपल्यावर विशेष प्रभाव. डॉ. गोगुलवार यांच्या साथीने आपण आयुष्याचा संसार तर मांडलातच पण त्याचबरोबर १९८२ साली 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी ' या संस्थेचीही सुरुवात केली. आपण संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात दिव्यांगांचे संघटन उभा केले. त्यामुळे सामूहिक शक्तीच्या जोरावर दिव्यांग आज आपले हक्क मिळवू लागले आहेत. आपली ही संस्था आदिवासी जनतेचे जणू कुटूंबच झाली आहे. आपण लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. वंचितांसाठी सुरु असलेले आपले हे कार्य पाहण्यासाठी देशभरातून संशोधक, अभ्यासक येत असतात. आपल्याला यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशस्विनी सामाजिक सन्मान" पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.