पृथ्वीराज माळी

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2025

महाराष्ट्रातल्या मराठी शाहिरीचं भवितव्य म्हणून पृथ्वीराज माळी यांच्याकडे पाहिले जाते ! "गर्जा महाराष्ट्र माझा..." अवघ्या तीन वर्षांच्या वयात ज्याच्या कंठातून शिवरायांचा पोवाडा घुमला, तो महाराष्ट्राचा लाडका बालशाहीर अर्थातच पृथ्वीराज माळी!

शाहिरीचा वारसा त्यांना घरातूनच लाभला. वडील शाहिररत्न देवानंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शाहिरी, लोकगीते आणि विविध वाद्यांचे धडे गिरवले. मुंबई दूरदर्शनवरील सर्वात लहान वयाचा शाहीर म्हणून त्यांनी नाव कोरलं. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू झालेला हा थक्क करणारा प्रवास आजही अविरत सुरू आहे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ मधील सलग २६ भागांचं सादरीकरण असो वा 'मी होणार सुपरस्टार'चं 'महाविजेतेपद'... पृथ्वीराजने प्रत्येक मंचावर लोककलेचा डंका पिटला. विश्व शाहिरी परिषदेपासून ते शिवजयंतीच्या भव्य सोहळ्यांपर्यंत, आपल्या बुलंद आवाजाने त्यांनी शाहिरी परंपरेला एक नवी उंची मिळवून दिली आहे. आज हा 'लोककलेचा शिलेदार' आणि 'शाहीर सम्राट' महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करत नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

शाहीर पृथ्वीराज माळी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी