निखिल जाधव
युवा इनोव्हेटर पुरस्कार
2025
वाढतं प्रदूषण आणि वाढते इंधनाचे दर यावर प्रभावी उपाय शोधून ई-क्रांती घडवणारा एक तरुण अभियंता अर्थात इंजिनिअर निखिल जाधव ! 'परिवर्तन इनोव्हेशन्स’ हि संस्था स्थापन करून नोव्हेंबर २०२१ पासून ते ईव्ही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. केवळ ३ तासांत पेट्रोल वाहनाचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून होते.दूध व्यावसायिक आणि डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्यांसाठी त्यांनी किफायतशीर सोल्यूशन्स विकसित केली आहेत. त्यांच्या कार्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे 'अन्विक्षिकी' (ANVIKSHIKI) हे पेटंटेड मशीन, ज्याद्वारे कोअर रिपेअरिंग सहज शक्य होतं. तसेच ३० मिनिटांत ऑन-साइट ईव्ही रिपेअरिंगची सुविधाही ते पुरवतात.
'ईव्ही अकॅडमी'च्या माध्यमातून ते तरुणांना प्रशिक्षित करत आहेत. १००% प्लेसमेंट किंवा स्वतःचे ईव्ही सर्व्हिस सेंटर सुरू करण्यासाठी ते मोलाचं मार्गदर्शन करतात. त्यांनी जळगावच्या KCIIL आणि संभाजीनगरच्या MAGIC इंक्युबेशन सेंटरने त्यांच्या स्टार्टअपला पाठबळ दिले आहे. त्यांच्या ४ वर्षांच्या अनुभवाचा फायदा आज अनेकांना होत आहे.
ईव्ही क्षेत्रातील इंजिनिअर निखिल जाधव या 'परिवर्तना'च्या शिलेदाराला यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा युवा इनोव्हेटर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.




