शिवानी सोनवणे

युवा उद्योजक पुरस्कार
2024

मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या शिवानीला लहानपणापासून व्यवसायाची आवड होती. केजे सोमय्या कॉलेज मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात डॉ. बी.एन. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये प्रवेश मिळविला. आपल्या शिक्षणाचा व्यवसायात योग्य पद्धतीने उपयोग केला. आपल्या वयाच्या २१ व्या वर्षी शिवानी यांनी ‘द आर्यावर्त एस्केप’ या नावाने रिसॉर्ट चालू केले. फक्त चार निवासस्थानापासून सुरुवात केली होती. आजच्या घडीला पुण्यातील पानशेत आणि न्हावी या दोन ठिकाणी त्यांनी रिसॉर्ट चालू केले आहे. आजपर्यंत ३० हजाराहून अधिक लोकांनी या रिसॉर्टला भेट दिली आहे. या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ, ऑफिसचे कार्यक्रम, लहान मुलांचे event असे अनेक कार्यक्रम व उपक्रम शिवानी यांच्या मार्गदर्शनखाली चालू आहेत.

शिवानी यांचे ‘अकारा स्टुडिओ’ हे आर्किटेक्चरल फर्म आहे. नैसर्गिक साहित्य आणि पारंपारिक बांधकाम या तंत्रांवर त्यांचे फर्म अधिक लक्ष देते. शाश्वत विकासावर शिवानी यांचा भर आहे. आयआयएम बंगळुरू येथील गोल्डमन सॅक्स १०,००० महिला उद्योजकता कार्यक्रमाची शिवानी या पदवीधर आहेत. आर्यावर्त महाराष्ट्राचे सर्वोच्च जागरूक गेटवे डेस्टिनेशन बनवण्याचा त्यांचा मानस आहे. नाविन्यपूर्णतेच्या शोधातून आपल्या आगळ्या वेगळ्या करिअरची शिवानी यांनी वाट पकडली आणि यशस्वी कामगिरी करून दाखवली. शिवानी यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, यात कसलीच शंका नाही.

शिवानी सोनवणे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी