सुश्रुत पाटील

युवा इनोव्हेटर पुरस्कार
2024

Bsc Biotechnology चे पदवीचे शिक्षण घेतलेल्या सुश्रुत यांना व्यवसायाची खूप आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना pharmaceutical नंतर brewery या उद्योगांची सखोल माहिती मिळविली परंतु कमी वय आणि लागणारी मोठी गुंतवणूक यामुळे त्या गोष्टीचा नाद त्यांनी सोडून दिला. आपल्या २८ जणांच्या एकत्र कुटुंबाला सांभाळण्यासाठी आपल्याला व्यवसाय करायचा आहे, हे त्यांच्या पक्के डोक्यात होते.

आपण लहानपणापासूनच आपल्या घरात हळद, ओव्याची पोळी, कडिपत्ता उन्हाळ वाळवताना पाहत आलो आहे, यालाच sun drying असे म्हणतात. याच्याच पुढे जाऊन मशिनच्या सहाय्याने फळांना ड्राय करून बाजारात विक्रीस आणण्याची आयडिया सुश्रुत यांच्या डोक्यात आली. त्यांनी स्वत: अभ्यास करून कस्टमाईझ मशिन बनवून घेतली. FRUTTONS या कंपनीच्या माध्यमातून ड्राय फळे विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांना बाराही महिने आपल्या आवडीची फळे खाण्यास मिळत आहेत. ताज्या फळांना ड्राय केल्यामुळे त्यातील गुणवैशिष्ट्ये नष्ट न होऊ देण्याचे श्रेय सुश्रुत यांच्या अभ्यासपूर्ण मशिनला आहे. सुश्रुत यांच्या व्यवसायास त्यांच्या आईची मोलाची साथ आहे. त्यांच्या कंपनीत १०० टक्के महिलांना प्राधान्य असून साठहून अधिक महिला काम करत आहेत.

‘मी केली तर शेती करेन नाहीतर व्यवसाय करेन”, असे अकरावीत असताना सुश्रुत याने घरच्यांना ठामपणे सांगितले होते. आता वर्तमानात शेती संबंधित व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या सुश्रुत पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी