हृतिका श्रीराम

युवा क्रीडा पुरस्कार
2024

हृतिका यांना पहिल्यांदा जेव्हा ब्राँझ पदक मिळाले होते तेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुमचे प्रशिक्षक कोण आहेत? तेव्हा तिच्या पाठीमागे तिचे वडील उभे होते. एकही प्रशिक्षक नसताना, फक्त स्विमिंगची आवड आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हृतिका श्रीराम आंतरराष्ट्रीय कीर्तीची स्विमर बनली आहे.

आपल्या सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हृतिकाने २०१०ची दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण त्यानंतर लगेचच हृतिका यांना खांद्याची गंभीर दुखापत झाली. वेदना असह्य होत्या. शस्त्रक्रियेशिवाय दुसरा मार्ग नव्हता. या छोट्याश्या pause मध्ये त्यांचे शरीर पाणी विसरले नव्हते. या दरम्यान त्या अधिक मजबूत, दृढनिश्चयी झाल्या. त्यांची उर्जा दुप्पट झाली होती. त्यांचा जिवलग मित्र आणि प्रशिक्षक म्हणजेच त्यांच्या पतीच्या पाठींब्याने त्या पुन्हा एकदा पाण्यात उतरण्यास सज्ज झाल्या.

हृतिका एके ठिकाणी सांगतात की स्विमर बनण्याचे स्वप्न माझ्या आईचे होते, तेच स्वप्न मी जगत आहे, याचा मला अभिमान आहे. हृतिका यांना २०१६ सालच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

स्वतःच्या मर्यादा झुगारून आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या हृतिका श्रीराम यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी