ओजस देवतळे

युवा क्रीडा पुरस्कार
2024

आर्चरी या क्रिडा प्रकारची ओळख होण्यापूर्वी ओजस देवतळे रोलर स्केटिंग करत होता. रोलर स्केटिंगमध्ये राज्यस्तरीय पदके जिंकणारा ऑन व्हील्सचा तो एक गुणी खेळाडू होता. परंतु, नियतीच्या काही वेगळ्याच योजना होत्या. २०१५ मध्ये, उन्हाळी शिबिरात त्याला आर्चरीची ओळख झाली. प्रशिक्षक सत्यजीत येलणे यांच्या मार्गदर्शनाखाली ओजसने आर्चरी या क्रीडा प्रकारात पारंगत झाला. ओजसच्या आयुष्यात अनेक अडथळे आले परन्तु त्या अडथळ्यांच्या पायऱ्या करीत ओजस जागतिक किर्तीचा खेळाडू बनला.

२०२२ मध्ये ज्युनिअर संघाचे सगळे विश्वविक्रम मोडून त्याने वरिष्ठ संघात आपले स्थान निश्चित केले. आशियाई स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय म्हणजे ओजस, बर्लिन येथे आयोजित जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून जागतिक खेळाडू बनणारा पहिला भारतीय म्हणजे ओजस…! केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार २०२३ ओजसला मिळाला आहे. यासह अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित केले आहे. सांघिक विजयांसह, वैयक्तिक सुवर्णपदकापर्यंत ओजस हा अजिंक्य राहिला आहे. आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या जोरावर अगदी लहानवयात डोळे दिपवून टाकणारी त्याची कामगिरी आहे.

आयुष्यात अचूक नेम साधत भारताचा अभिमान बनलेल्या ओजस देवतळे याला यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रिडा पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी