मृदगंधा दिक्षित

युवा साहित्य पुरस्कार
2024

समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये मृदगंधा दीक्षित यांचा जन्म झाला. गारगोटी येथे तिच्या शिक्षणाची सुरुवात झाली आणि पुढे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने कोल्हापूर गाठले. त्यानंतर पुण्यात कायद्याचे शिक्षण घेतले आणि चार वर्षे वकिलीची प्रॅक्टिस केली. परंतु नियतीने तिच्यासाठी एक वेगळी पायवाट आखली होती.

कोर्टरूम मागे सोडून तिने शब्दांच्या दुनियेला स्वीकारले. साधना साप्ताहिक आणि साधना प्रकाशन येथे काम करण्यास सुरुवात केली. हे काम करत असतानाच तिने पत्रकारितेतील डिप्लोमा केला. आजपर्यंत तिने बालकुमार साधना मध्ये लिखाण केले आणि अनुभव मासिक मध्ये ‘रसिकतेची रेसिपी’ ही लेखमालिका लिहिली आहे. सध्या अनुभव या मासिकामध्ये ‘डोक्यावर पडलेल्या गोष्टी’ ही लेखमालिका मृदगंधा लिहित आहे. या लेखमालिकेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

२०२३ मध्ये, मृदगंधा यांनी ‘करुणापटो’ ही कादंबरी लिहिली आणि तिच्या साहित्यिक प्रवासातला तो एक मैलाचा दगड ठरला. याच कादंबरीस चव्हाण सेंटरची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचार मिळाली आहे. रणधीर शिंदे, गणेश विसपुते आणि सुहास कुलकर्णी यांसारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली तिचा साहित्यिक प्रवास चालूच आहे. उत्तरोत्तर तिचा साहित्यिक प्रवास वृद्धिंगत होत राहो, याच सदिच्छा !

शिक्षणाने वकील आणि आवडीने लेखिका असणाऱ्या मृदगंधा दीक्षित यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी