तन्वी पालव
युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2024
लहानपनापासूनच तन्वी यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. गंधर्व महाविद्यालय आयोजित भारतीय शास्त्रीय नृत्य - कथ्थक मध्ये तन्वी यांनी प्रथम श्रेणीसह चार पुरस्कारांसह नृत्यविशारद ही पदवी मिळविली. श्रीमती लता बाकलकर या त्यांच्या गुरु आहेत. नृत्यासाठी त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती, टेरेन्स लुईस डान्स फाउंडेशनची शिष्यवृत्ती, जकार्ता येथील इंडोनेशियन सरकारी कला आणि सांस्कृतिक (BSBI) शिष्यवृत्ती २०१६ शिष्यवृत्ती यांसारखे अनेक फेलोशिप मिळाल्या आहेत.
‘रंग माझा वेगळा’, ‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकांमध्ये तसेच ‘व्हॅक्यूम क्लिनर’, ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कोलगेट, बिग बाजार, मध्यप्रदेश टुरिझम, अनुरुप विवाह संस्था, रिलायन्स ज्वेलर्स यांसारख्या अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या रंगमंचावर सादर होत असलेल्या हिंदी, मराठी नाटकांचे नृत्यदिग्दर्शन देखील त्यांनी केले आहे. तन्वी यांच्या एकुणात कारकिर्दीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कथ्थक या नृत्यक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांना तन्वी यांनी शिकविण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी तीन जणांना शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील बक्षिसे मिळाली आहेत.
तन्वी यांचा नृत्य आणि अभिनय क्षेत्रातला प्रवास वृद्धिंगत व्हावा, याच सदिच्छा !