दरवर्षी नवमहाराष्ट्र युवा अभियान, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक, क्रीडा, कालविष्कार, उद्योजकता, साहित्य, पत्रकारिता व नाविन्यता युवा पुरस्कार दिले जातात. सर्व विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार' (युवक व युवती), 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार'(युवक व युवती), ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य युवा पुरस्कार’ (यूवक व युवती), 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय रंगमंचीय कालविष्कार युवा पुरस्कार'(युवक व युवती) व 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार'(युवक व युवती) . तसेच नमूद केलेल्या वरील पुरस्कार व तो क्षेत्र व त्या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार दिला जातो आणि युवक व युवती न प्रोत्साहन मिळावे हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणा-या युवक-युवतीना हा पुरस्कार देण्यात येतो.