स्वप्नील कुसळे

युवा क्रीडा पुरस्कार
2023

क्रीडा उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रीडा प्रबोधिनी शाळेत स्वप्नीलने प्रवेश घेतला. त्याची खेळातील रुची आणि क्षमता बघून त्याच्या वडिलांनी स्वप्नीलचे नाव महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी मध्ये नोंदणी केली. एक वर्षाच्या अथक मेहनती नंतर आणि प्रशिक्षणानंतर स्वप्नीलला नेमबाजीची आवड निर्माण झाली.

2015 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियन बनून स्वप्नील यांनी एका उत्कृष्ट कारकीर्दीची सुरुवात केली. 2022 पर्यंत, स्वप्नीलने ISSF विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स स्पर्धेसाठी जगात दुसरा क्रमांक मिळविला. ऑक्टोबर 2022 मध्ये जेव्हा स्वप्नीलने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले तेव्हा कॅरो येथील ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स स्पर्धेत चौथे स्थान मिळवले, हे देशासाठी अभिमानस्पद होते.

2022 च्या हँगझोऊ, चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, स्वप्नीलने वैयक्तिक सुवर्णपदक किरकोळपणे गमावले परंतु 50 मीटर रायफल सांघिक स्पर्धेत ऐश्वरी प्रताप सिंग तोमर आणि अखिल शेओरन या जोडीसह सुवर्णपदक जिंकले.

एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्वप्नील कुसळे आणि सहकाऱ्यांनी पुरुषांच्या गटात ५० मीटर रायफल 3 पोझिशन्ससाठी त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यामध्ये त्यांनी 1769 गुणांचा विक्रम केला होता.

अथक परिश्रम, जिद्द, सातत्याच्या जोरावर उभा असलेला स्वप्नीलचा प्रवास जगभरातील महत्त्वाकांक्षी खेळाडूंना प्रेरणा देत आहे, हे नमूद करावे लागेल.

स्वप्नील कुसळे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी