डॉ. प्रशांत खरात

युवा इनोव्हेटर पुरस्कार
2023

प्रशांत खरात यांना लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न असल्यामुळे, संघ लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 3 उत्तीर्ण होऊन एसएसबीचे इंटरव्ह्यू दिले, परंतु सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले. यातून खचून न जाता त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्र या विषयाची औरंगाबाद येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षण देणारे बहुतांशी सर्वच प्राध्यापक त्यांच्या विषयातील विख्यात तज्ञ प्राध्यापक होते. त्यामुळे विषयात रुची निर्माण होऊन संशोधनवृत्ती वाढीस लागली.

त्यांनी पीएच.डी. संशोधना दरम्यान, मॅग्नेटिक फ्लुइड हायपरथर्मिया (MFH) वर काम केले. हा एक वैद्यकीय उपचार आहे ज्यामध्ये शरीराच्या लक्षित क्षेत्रामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी चुंबकीय नॅनोकणांचा वापर केला जातो. ही उष्णता नंतर कर्करोगासह विविध वैद्यकीय परिस्थितींवर उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

मॅग्नेटिक फ्लुइड हायपरथर्मिया (MFH) हा कर्करोगाचा उपचार आहे जो उष्णता निर्माण करण्यासाठी चुंबकीय नॅनोपार्टिकल्स (MNPs) आणि अल्टरनेटीव चुंबकीय क्षेत्र (AMF) वापरतो. कर्करोगाच्या पेशी नष्ट करून ट्यूमर नष्ट करण्यासाठी उष्णता पुरेशी आहे.

मॅग्नेटिक फ्लुइड हायपरथर्मिया हे एक आशादायक क्षेत्र आहे, तरीही ते प्रायोगिक किंवा प्रारंभिक क्लिनिकल चाचणी टप्प्यात आहे आणि त्याच्या व्यापक क्लिनिकल अनुप्रयोगासाठी पुढील संशोधन आणि विकासाची आवश्यकता आहे, असे प्रशांत यांचे मत आहे.

जानेवारी 2019 मध्ये माझे – भौतिकशास्त्र पीएच.डी.पूर्ण केल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये भौतिकशास्त्र विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, अमरावती येथे पूर्णवेळ सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी त्यांचे संशोधन चुंबकीय नॅनोपार्टिकल्स, गॅस सेन्सिंग तंत्रज्ञानासह व सुपरकॅपॅसिटर क्षेत्रात सुद्धा सुरु ठेवले आहे.

डॉ. प्रशांत खरात यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.