मीनल वर्तक
युवा उद्योजक पुरस्कार
2023
२००९ ते २०१८ या काळात नवजात अतिदक्षता विभागात मीनल यांनी काम केले. परंतु त्यांचा कल नेहमी आहार, अन्न सुरक्षितता याकडे होता. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये आउटडोअर केटरिंग सुरु केली. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ जास्त काळ टिकावेत यासाठी त्यांनी अभ्यास करून, R&D करून विविध सॅम्पल्स डेव्हलप केले. मीनल यांनी २०२० मध्येच फूड मॅनुफॅक्चरिंग आणि पॅकेजींग युनिट' सुरु केले. चितळे बंधू मिठाईवाले यांचे मार्गदर्शन आणि 'जनता सहकारी बँक' यांनी आर्थिक सहाय्य केले.
सध्या त्या व्हायट लेबल उत्पादन क्षेत्रात काम करीत आहेत. पुरणपोळी, खव्याची पोळी, गुळपोळी, सांज्याची पोळी, ड्राय फ्रुट्स, चिक्की, मिलेट्सची उत्पादने त्यांच्याकडे
उपलब्ध आहेत. चितळे बंधू मिठाईवाले यांना खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम मीनल आणि सहकारी करत आहेत.
मीनल यांच्या कंपनीत ७० हून अधिक महिला कामगार आहेत. रोजगार प्राप्ती मुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होत आहे.
मीनल वालावलकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.