पर्ण पेठे

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2023

विहीर, रमा माधव, फोटोकॉपी, फास्टर फेणे, मेडियम स्पायसी यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी गुणी अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. आसक्त कलामंच या थिएटर ग्रुपचा त्या महत्वपूर्ण भाग आहेत. पहिल्यापासूनच त्यांना नाटका विषयी ओढ होती. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने “नाटक कंपनी” या संस्थेची स्थापना केली. पर्ण पेठे आणि अतुल पेठे यांच्या अभिनयाने सजलेले “अडलंय का?” हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. नाटक विश्वात प्रथमच मुलगी आणि वडील यांनी एकत्र स्टेज गाजवत आहेत.

आषाढातील एक दिवस, अमर फोटो स्टुडीओ, चारचौघी यांसारख्या गाजलेल्या नाटकात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे.

पर्ण पेठे यांनी मानसिक आरोग्यावर आधारित सहा लघुपटांची निर्मिती केली आहे. ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ या नावाने यूट्यूबवर प्रसिद्ध आहे. त्यांना रमा माधव या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, युवा नाट्य कलावंतांना दिला जाणारा प्रतिष्ठित नर्गिस दत्त पुरस्कार, विनोद दोशी फेलोशिप, झी नाट्य गौरव पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

पर्ण पेठे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी