रुद्राक्ष पाटील

क्रीडा पुरस्कार
2022

रुद्रांक्ष पाटील यांनी रायफल शुटिंगची सुरुवात २०१६ मध्ये केली. द्रोणाचार्य शूटिंग अकॅडमी, ठाणे येथे स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले. सन २०१९ सालापासून अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रशिक्षण चालू आहे.

आई वडील दोघेही सरकारी अधिकारी असताना देखील त्यांच्या क्षेत्राकडे न वळता रुद्रांक्ष यांनी स्वतःचे क्षेत्र निवडले आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

आताच्या घडीला रुद्रांक्ष यांचे जागतिक रॅकिंग पहिली आहे. त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी खूप सदिच्छा…!

रुद्रांक्ष पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय क्रीडा युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी