हीनाकौसर खान

साहित्य पुरस्कार
2025

मुक्त पत्रकार आणि लेखिका म्हणून १६ वर्षांहून अधिक अनुभव हीनाकौसर खान यांच्याकडे आहे. स्त्रियांच्या आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी संवेदनशील आणि नैतिक पत्रकारितेत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.ए. मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता केली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये त्या पारंगत आहेत.

२००८ ते २०१६ दरम्यान लोकमत मीडिया मध्ये रिपोर्टर आणि सब-एडिटर म्हणून काम करत असताना त्यांनी मदरशा शिक्षणातील बदलांचा अभ्यास केला. २०१९ ते २०२२ दरम्यान कर्तव्य साधना मध्ये सिनियर सब-एडिटर म्हणून काम करताना महिला आणि बालकांच्या मुद्द्यांवर विशेष कथा त्यांनी लिहिल्या आहेत.

त्यांच्या लेखणीतून अनेक कादंबऱ्या निर्माण झाल्या आहेत. अल्पसंख्याक मुद्द्यांवर आधारित ‘इज्तिहाद’, आंतरधर्मीय विवाहांवर आधारित ‘धर्मरेषा ओलांडताना’, ट्रिपल तलाकविरोधी संघर्षावर आधारित ‘तीन तलाक विरोधी पाच महिला’ यासह ‘इत्रनामा’ या कादंबऱ्या प्रकाशित आहेत.

लाडली मीडिया फेलोशिप २०२४, साउथ आशिया लाडली अवॉर्ड २०२४, लोकमत मीडिया साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान फेलोशिप (२०२३), युनिसेफ चरखा फेलोशिप (२०१८) यांसारखे अनेक पुरस्कार आणि फेलोशिप्स त्यांनी मिळविल्या आहेत.

हीनाकौसर खान यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.