ज्येष्ठ नागरिक संघ, चैतन्यनगर, जळगाव

राज्यस्तरीय पुरस्कार
2024

जळगावमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आशेचा किरण म्हणजे चैतन्यनगर, ज्येष्ठ नागरिक संघ ! ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी हा संघ आघाडीवर आहे. शून्यातून सुरवात झालेल्या या संघाची सभासद संख्या आता १६८ वर पोहोचली आहे. प्रेम, काळजी आणि मायेने वाढणारे हे एक छोटेसे कुटुंबच !

प्रत्येक महिन्याच्या शेवटी वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार, राष्ट्रीय योग दिनानिमीत्त योग प्रशिक्षण शिबीर, बॉडी चेक-अप शिबीर तसेच उत्तर महाराष्ट्र वि‌द्यापीठातर्फे जेष्ठांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे देखील आयोजन या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत केले जाते.

सण, परंपरा जोपासण्यात हा संघ आघाडीवर आहे. गुढीपाडवा, दिवाळी अशा सणांच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेणेकरून सर्व ज्येष्ठ मंडळींचा आनंदात विरंगुळा व्हावा. ज्येष्ठ महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम देखील घेतला जातो.

दयाळूपणा, संस्कृती आणि काळजी या त्रिसूत्रीवर हा ज्येष्ठ नागरिक संघ उभा आहे. म्हातारपणातील सुवर्ण वर्षांसाठी हा संघ एक आधारस्तंभ आहे. अनेक ज्येष्ठांचा सोबती हा संघ आहे, अनेक ज्येष्ठांचा खांदा हा संघ आहे. अजून अनेकांना आधार देणे बाकी आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून उत्तरोतर अनेक सामाजिक काम घडो, या सदिच्छा !

चैतन्यनगर, ज्येष्ठ नागरिक संघ, जळगाव यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.