डॉ. सलमा खान
राज्यस्तरीय पुरस्कार
2025
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सलमा यांना लहानपणापासूनच ट्रान्सजेंडर म्हणून उपहास, तिरस्कार आणि भेदभावाचा सामना करावा लागला. तरीही, आईच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षण घेतले आणि समाजातील या दुर्लक्षित वर्गासाठी त्यांनी लढा उभारला. "आमचे जीवन नेहमीच हक्क आणि समानतेपासून दूर राहिले आहे, आणि महामारीने ते आणखी वाईट केले," असे त्या नेहमी म्हणतात. दयी वेल्फेअर सोसायटीमध्ये १९९५ ते १९९९ पर्यंत त्यांनी फील्ड ऑफिसर, हमसफर ट्रस्टमध्ये टीजी प्रतिनिधी, सायन हॉस्पिटलमध्ये काउन्सेलर म्हणून सेवा केली आहे. ‘किन्नर माँ’ या सामाजिक संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशन, एमएसए-दिवा प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ह्युमन राइट्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा आणि लोक अदालत मध्ये त्या पॅनेलिस्ट होत्या.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. २००६ मध्ये विरंगना सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर फेलोशिप, २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारकडून सामाजिक न्याय मंत्री पुरस्कार, २०१८ मध्ये जीवन गौरव पुरस्कार आणि कम्युनिटी आयडल अवॉर्ड, २०२० मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मेळाव्यात मुख्य अतिथी सन्मान, दादासाहेब फाळके कोरोना योद्धा पुरस्कार, आणि अलीकडेच सामाजिक न्याय मंत्रालयाकडून पहिला राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
एचआयव्ही प्रतिबंध, मानवी हक्क, स्वच्छता, शिक्षण संबंधी जनजागृती तसेच ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात समावेशासाठी जागृती निर्माण करणे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या खूप सक्रिय असतात.
सलमा खान यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.