श्रीराम पान्हेरकर
राज्यस्तरीय पुरस्कार
2025
चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्रात नोकरी करताना जशी सवड मिळेल तसे त्यांनी समाजकार्य करीत राहिले. जशा सुट्ट्या मिळेल तशा आवडीने यथायोग्य सेवा कार्य त्यांनी केले. पुढे सोमनाथ येथील कर्मयोगी बाबा आमटे यांच्या ‘माझे श्रम संस्कार’ या छावणी शिबिरात ते सहभागी झाले व त्या काडाक्याच्या उन्हाळ्यात सकाळी श्रमदान व दुपारी बौध्दिक खाद्य मिळत असे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुब्बाराव, लेखक पत्रकार यदूनाथ थत्ते, राम शेवाळकर, प्राचार्य डॉ. सोमनाथजी रोडे या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्यात समाजभान बिजांकुर रूजले व त्यांनी समाज कार्याची वाट पकडली.
श्रीराम यांच्या पुढाकारातून ‘रक्त सहयोग चळवळ’ राबविली जाते.आजवर त्यांच्यामुळे शेकडो गरजू रुग्णांना त्यांच्या मित्र परिवाराला वेळोवेळी रक्ताची मदत मिळाली आहे. श्रीराम हे स्वतः उजवा पोलीओ ग्रस्त असल्यामुळे दिव्यांगाच्या यातना समस्या व आनंदवन प्रयोगवनाची प्रेरणा यामुळे आजवर लोक सहभागातून त्यांनी शेकडो दिव्यांगांना सायकली व इतर उद्योजकीय सहाय्य उपलब्ध करून दिलेले आहे.
त्यांचे लग्न झाल्यावर त्यांनी ‘एक दाम्पत्य, एक अपत्य’ असा संकल्प केला आणि कृतीतून पूर्णत्वास नेला. त्या नंतर त्यांनी १९९० रोजी एका मुलाला दत्तक घेतले. आज तो बी.ए. एम.एल.एस मास्टर इन लेबर स्टडीज आहे. तसेच नागपूरच्या मातृ सेवा संघ, लता मंगेशकर मेडीकल कॉलेज, कामठी चे विवेकानंद अनाथालय तसेच चंद्रपूरच्या किलबिल संस्थेतुन इतर निपुत्रीकांना दत्तक घेण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे.
मरणोत्तर देहदान, अवयवदान संकल्प त्यांनी केला आहे. यातून राष्ट्रीय कर्ज उत्तरदायीत्व निभावल्याचे समाधान मिळेल, अशी त्यांची भावना आहे.
श्रीराम पान्हेरकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.