चेलनादेवी खुरपे

राज्यस्तरीय पुरस्कार
2025

२००९ पासून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी चेलनादेवी फेसकॉमच्या प्रादेशिक विभागात सक्रीयरीत्या कार्य्ररत आहेत. सांगली जिल्ह्यात १३० ज्येष्ठ नागरिक संघांची त्यांनी स्थापना केली असुन, त्यातील ४७ महिला संघ आहेत. ज्येष्ठ महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक संघाला भेटी देऊन त्यांनी विविध प्रकारे ज्येष्ठांचे प्रबोधन केले आहे. ज्येष्ठ नागरिक कायद्याची ज्येष्ठांना माहीती व्हावी यासाठी विधी साक्षरतेचे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. ज्येष्ठांसाठीच्या शासकीय योजनांची आणि आरोग्यविषयक योजनांची माहिती त्यांना मिळावी यासाठी चेलनादेवी यांनी अनेक कार्यशाळांचे आयोजन सांगली जिल्ह्यात केले आहे. शेकडो महिला आणि पुरुषानी यात सहभाग नोंदवला आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठांसाठी त्या दरवर्षी "मनोहारी मनोयुवा" मेळावा आयोजित करतात. ज्येष्ठांच्या मानसिक किंवा शारीरिक छळाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाय शोधण्याचा त्यांचा पुढील संकल्प आहे.

सकाळ दैनिकातील मुक्तपीठ सदरात त्यांनी नियमितपणे लिखाण केले आहे. चेलनादेवी यांनी लिहिलेल्या "संवाद" पुस्तकाचे प्रकाशन डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले आहे. सांगली जिल्ह्यात प्लास्टिक मुक्ती अभियान सुरू करून पर्यावरण जागृतीचे काम त्यांनी केले आहे. सांगली येथील बाल सुधार गृहात प्रबोधनपर विविध कार्यक्रम घेऊन बालकांसाठी महत्वाचे कार्य त्या करत आहेत.

चेलनादेवी खुरपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी