द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नवी मुंबई
दिनांक : 
12 मार्च 2022
वेळ : 
05:00
ठिकाण : 
यशवंतराव चव्हाण सेंटर,जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०९ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०२१' हा पुरस्कार जैवतंत्रज्ञान विभागाच्या भूतपूर्व सचिव डॉ. रेणू स्वरुप यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा सोहळा शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडेल. तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या फेसबुक लाईव्ह (https://facebook.com/ycp100) हा कार्यक्रम पाहता येऊ शकतो.


interactive google maps for website