राष्ट्रीय युवा धोरण 2021 ला अनुसरून महाराष्ट्रातील 6 विभागात होणार 6 चर्चासत्र

यशवंतराव चव्हाण सेंटर महाराष्ट्रात गेल्या ३ दशकांहून जास्त वेळ आजतागायत विविध क्षेत्रांत अविरत कार्यरत आहे व या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या मते, " युवा पिढी हीच कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती व शक्ती आहे". याच तरुणाईच्या विधायक शक्तीला योग्य शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून कृतिशील बनवल्यास तो खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मितीत आपले भरीव योगदान देऊ शकतो. याच विचारांचा आदर्श समोर ठेवून यशवंतराव चव्हाण सेंटर अशा विषयांवर राज्यभर अनेक कामे करत आहे.

केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण - २०२१ चा मसुदा जारी करून हितधारकांच्या शिफारशी,दृष्टिकोन आणि मत मागविले आहेत. या धोरणाद्वारे तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी १० वर्षांचा आराखडा सादर केला आहे. यामध्ये शिक्षण, रोजगार व उद्योजकता, नेतृत्वविकास, आरोग्य, क्रीडा व सामाजिक न्याय या बाबींवर प्राधान्य निश्चित केले आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर युवा विभागाद्वारे आपण राज्यभरात ६ चर्चासत्रे/ कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. ज्यामध्ये विविध सामाजिक संस्था, सामाजिक महाविद्यालये, युवा संघटना, मंडळे, इ. यांना आपण त्यांची या धोरणावरील मते प्रखरपणे मांडण्यासाठी विनम्रपूर्वक आमंत्रित करीत आहोत.

तरी आपला सहभाग नोंदवून राष्ट्रीय युवा धोरण (सुधारणात्मक) -२०२१ मसुदा तयार करण्यात आपणही सहभाग नोंदवाल असा आशावादी दृष्टिकोन ठेवूया.

सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

ठिकाण :

नाशिक / औरंगाबाद / नागपूर / अमरावती / बारामती / मुंबई

Note: या चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
संतोष मेकाले -९८६०७४०५६९
( यशवंतराव चव्हाण सेंटर )