यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘महाराष्ट्र क्रिएटर समिट’ आयोजित करण्यात आली. याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या. आज समाजात अनेक विषय आहेत. क्रिएटर यांनी पुढाकार घेऊन त्यावर काम करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर मराठी भाषा जपण्यासाठी देखील काम करणे गरजेचे आहे. नेटवर्किंग, थिंकिंग आणि इव्हाॅल्विंग या त्रिसुत्रीवर आगामी काळात भर देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच स्व. चव्हाण साहेब यांच्या जयंतीदिनी पाच क्रिएटर व्यक्तींना फेलोशिप देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली.
या क्रिएटर समिट मध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ‘डिजिटल कंटेंट -आशय निर्मितीमध्ये भाषा, बोली आणि प्रादेशिक संस्कृतीचे स्थान’ या विषयावर सुमन धामणे (आपली आजी), संजय कांबळे (खास रे टिव्ही), प्रसाद गावडे (कोकणी रानमाणूस), सुयोग (व्हायफळ), संतोष जाधव (इंडियन फार्मर) आणि सुरज खटावकर (मराठी किडा) यांनी चर्चा केली. ‘आशय निर्मितीतून (Content Creation) आर्थिक उत्पन्न’ या विषयावर उर्मिला निंबाळकर, सुकीर्त गुमास्ते, आकाश जाधव (इंडियन फार्मर), सरिता किचन, सुयोग (व्हायफळ) यांनी चर्चा केली. ‘स्वामित्वहक्क (कॉपीराइट) / बौद्धिक संपदा हक्क (आयपी) संबंधी प्रश्न आणि अभिनव आशय निर्मिती’ या विषयावर उज्वला कामत, ओंकार जाधव, पॉला मॅकग्लिन, समीर खांडेकर, समीक्षा टक्के, रौनक रामटेके यांनी चर्चा केली. कंटेंट क्रिएटरची सुरक्षितता (सायबर सुरक्षा, हॅकिंग,धमक्या, ट्रोलिंग,डिजिटल कंटेंट क्रिएटरचे मानसिक आरोग्य) या विषयावर शार्दुल सूर्यवंशी, रवि सूर्यवंशी, पॉला मॅकग्लिन, मुक्ता नार्वेकर, सौरभ भोसले, उर्मिला निंबाळकर यांनी चर्चा केली.
या कार्यक्रमासाठी भाडीपा-विषय खोल, अमुक- तमुक आणि खास रे टीव्ही यांचे विशेष सहकार्य लाभले. डिजिटल माध्यमातून व्यक्त होत जनतेच्या मनामध्ये घर करणारे सर्व क्रिएटर्स या समिटसाठी उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.