आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' १२ डिसेंबर २०२१ या वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते.

फेलोशिपसाठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. यास राज्यभरातून भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो प्रस्ताव दाखल झाले होते.

या प्रस्तावांवर अतिशय काळजीपूर्वक विचार करुन निवडसमितीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ६४, ‘शरद पवार साहित्य फेलोशिप' साठी १२ आणि ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ साठी ४० अशा एकूण १३२ फेलोंची निवड केली आहे.

एज्युकेशन फेलोशिपसाठी निवड झालेल्या फेलोंची नावे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप या संकेतस्थळावर पाहता येतील. या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

फेलोशिप इन एज्युकेशन रिझल्ट

यावर्षी फेलोशिप न मिळालेल्या उमेदवारांनी निराश न होता पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा, आपणास नक्की यश मिळेल.