यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी तेरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद-२०२२ आयोजित करण्यात आली आहे. या शिक्षण परिषदेचा विषय ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी’ हा असणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरण मंजूर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात शासनाच्या पातळीवर काही निर्णय होताना दिसत आहेत. या अनुषंगाने पालक, शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या मनातील शंका आणि त्यांची मनोभूमिका, शासनाची भूमिका तसेच इत्यादी बाबींवर विचारमंथन व्हावे, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.

ही शिक्षण परिषद मुंबई येथे प्रत्यक्ष स्वरुपात होणार आहे. ज्यांना या शिक्षण परिषदेस उपस्थित राहायचे आहे त्यांनी खाली दिलेला गुगल फार्म भरावा.

नोंदणी करा

रविवार दि. ४ डिसेंबर २०२२
सकाळी | स. ९.३० ते सायं. ५.३०
स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

डाॅ.वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक, शिक्षण विभाग,
यशवंतराव चव्हाण सेंटर.