देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन' मधील यशस्वी फेलोंची नावे आज स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीत फेलोशिपच्या निमंत्रक व चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी घोषित केली. ज्येष्ठ शस्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, एमकेसीएलचे मुख्य मेंटॉर डॉ. विवेक सावंत, शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे सह निमंत्रक व यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, शिक्षण विकास मंचच्या डॉ. बसंती रॉय यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी या फेलोशिपसाठी अर्ज केले होते. त्यांपैकी प्राथमिक विभागातील दहा आणि माध्यमिक विभागातील दहा अशा वीस यशस्वी शिक्षकांची नावे निवडण्यात आली आहेत. त्या सर्वांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
ती पुढील प्रमाणे :
प्राथमिक विभाग शिक्षक :
सोमनाथ वामन वाळके, प्रवीण दत्तात्रय शिंदे, वर्षा विशाल गायकवाड, जगदीश श्रीकृष्ण कुडे, गजानन निवळे, रामकृष्ण वाटेकर, राजकिरण आत्माराम चव्हाण, किशोर मोतिराम भागवत, कृष्णा खंडू कुदळे, उमेश रघुनाथ खोसे
माध्यमिक विभाग शिक्षक :
नंदकिशोर तुकाराम बोकडे, कृष्णात दामोदर जाधव, अतुल बाळकृष्ण सवाखंडे, पूनम लक्ष्मण पाटील, रामू सिताराम जाधव, विवेक गुणवंतराव चव्हाण, डॉ. सोमनाथ श्रीरंग राऊत, शिवानी सचिन लिमये, मंगेश कडलग, शिल्पा किशोर पाटील – भोंडे
अधिक माहितीसाठी https://www.sharadpawarfellowship.com/result/education-result या वेबसाईटला भेट द्यावी
या फेलोशिपच्या सल्लागार समितीमध्ये श्री विवेक सावंत, डॉ. वसंत काळपांडे, उषा राणे, डॉ. हेमचंद्र प्रधान, निलेश निमकर, डॉ. सुरेश सावंत, सुषमा शर्मा, डॉ.अ. ल. देशमुख हे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज असून फेलोंची निवड करण्यासाठी नामदेव माळी - मिरज, डॉ. गणपती कमळकर - कागल, संदीप पवार - जरेवाडी, अमरजा जोशी - पुणे, कमलाकर महामुनी - पुणे, आदिती नातू - पुणे , रमेश ठाकूर - औरंगाबाद, समशुद्दीन आत्तार - सिंधुदुर्ग, संजीव अक्कलकोटे - सोलापूर, प्रतिभा भराडे - सातारा, जे. के. पाटील - जळगाव, राजश्री साळगे - मुंबई, दीपिका गावडे - मुंबई, डॉ. माधव सूर्यवंशी - मुंबई, योगेश कुदळे - इस्लामपूर, डॉ. वर्षा कुलकर्णी - कराड यांच्या निवड समितीने काम पाहिले.