यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक विषयावरील लेखनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘डाॅ.कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षीचा ‘डाॅ.कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार’ एकूण पाच पुस्तकांना जाहीर झाला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या शिक्षण परिषदेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गौरवपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

’डाॅ.कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार’ खालील पुस्तकांना जाहीर झाला आहे.

  1. शिकणारी शाळा ‘अभि’ रंग आणि ‘बाल’ रंग - दि शिक्षण मंडळ, गोरेगाव - ग्रंथाली प्रकाशन
  2. कर्णबधिरांच्या विश्वात - लेखिका उषा धर्माधिकारी - ग्रंथाली प्रकाशन
  3. सर्वांसाठी शिक्षण - लेखिका रजनी परांजपे - अनघा प्रकाशन
  4. ऑनलाईन शिक्षण पद्धती - लेखक डॉ. गणपती कमळकर - अक्षर प्रकाशन
  5. मराठी विज्ञान परिभाषा - लेखिका डॉ. मेधा उज्जैनकर - आर्ष पब्लिकेशन

सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.