यशवंतराव चव्हाण सेंटरच्या युवा विभागाच्या वतीने दरवर्षी “अभिसरण - युथ एक्सचेंज प्रोग्राम” आयोजित केला जातो. यावेळी विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र असा हा दौरा आयोजित केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ एप्रिल, २०२३ आहे

नाव नोंदणी करण्यासाठी

हा उपक्रम आहे तरी काय?

वैविध्यपूर्ण आणि संपन्नतेने नटलेल्या या महाराष्ट्रातील युवांनी, आपला परिसर सोडून मराठी मुलुखाच्या कानाकोपर्‍यात जावून तेथील माहीती तसेच तेथील आचार-विचार, भाषा, आवडी-निवडी, सवयी, व्यवहार, संस्कृती यांचे आदान-प्रदान करण्याची एक जाणीव प्रक्रिया म्हणजे युवा अभिसरण होय.

संकल्पना

आपल्या महाराष्ट्र वैविध्यपूर्ण आणि संपन्नतेने नटलेला असा हा मुलुख आहे. या बद्दल बोलायचे झाले तर वेळ आणि जागा कमी पडेल. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक भूभागाचे एक वेगळेपण आहे. बोलीभाषा, बोलण्याची लकब, पेहराव, खाद्यसंस्कृती, आदराथित्य, पारंपारिक शेतीपद्धती, पारंपारिक व्यवसाय व उद्योगधंदे तसेच भौगोलिक, सामाजिक आणि राजकिय परिस्थिती त्याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते अगदी इथल्या निसर्गामध्येही हे वेगळेपण जाणवते. ही महाराष्ट्रभूमी संतांची, सुधारकांची, शुरांची अन् वीरांची, कलावंतांची अन् साहित्यिकांची, कष्टकर्‍यांची अन् शेतकर्‍यांची, उद्योजकांची अन् राज्यकर्त्यांची…! या सर्व गोष्टी जाणून घेण्याने, जोपासल्यामुळे आपली मराठी अस्मिता टिकेल असे आम्हाला वाटते. महाराष्ट्र राज्याची पन्नास वर्षे उलटून गेली तरीही हे सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी, जोपासण्यासाठी काही ठोस उपक्रम हाती घेण्याचे सोडून आपणा मात्र ‘प्रयत्न करायला पाहीजे’ अशीच भाषा करतोय. प्रांतवाद किंवा भाषावाद उकरुन हीच मराठी अस्मिता हिंसक मार्गाने रस्त्यावर आणण्यापेक्षा आता ही मराठी मने या मराठी मातीशी जोडण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. ही गरज जाणून आणि महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या युवा विभागाने युवा देशाच्या युवा राज्यातील युवांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आणि सुरु केला अनोखा उपक्रम... युवा अभिसरण…!

मोहिमेच्या ठळक बाबीं :

मोहिमेकरीता निवडलेले विभाग:
विदर्भातील बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. या जिल्ह्यातील युवक/युवती या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील.

मोहिमेतील सहभागासाठी :
  • मोहिमेकरीता निवड होण्यासाठी गुगल फॉर्म द्वारे अर्ज करावयाचा असुन आवश्यक वाटल्यास मुलाखतींही घेण्यात येतील.
  • सदर मोहीमेकरीता १८ ते २५ वयोगटातील महाविद्यालयीन व बिगर महाविद्यालयीन युवक /युवती यामध्ये सहभागी होऊ शकतील.
मोहीमेचे स्वरुप:
  • दि. ९ मे २०२३ (पहिला दिवस) - यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र, अमरावती (मध्यवर्ती ठिकाण) : विदर्भ विभागातील ठळक बाबी आणि वैशिष्ट्यांविषयी वेगवेगळे खेळ, एक्झरसाईझेस आणि तज्ञ, जाणत्यांच्या माहीतीपर व्याख्यानातुन विस्तृतपणे ओळख करुन दिली जाईल.
  • दि. १० मे २०२३ (दुसरा दिवस) - निसर्ग, मार्केटयार्ड, पुणे (मध्यवर्ती ठिकाण) : पश्चिम महाराष्ट्र विभागातील ठळक बाबी आणि वैशिष्ट्यांविषयी वेगवेगळे खेळ, एक्झरसाईझेस आणि तज्ञ, जाणत्यांच्या माहीतीपर व्याख्यानातुन विस्तृतपणे ओळख करुन दिली जाईल.
  • दि. ११ मे ते १८ मे २०२३ (तिसरा ते आठवा दिवस) - पश्चिम महाराष्ट्र विभागातील पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये संमिश्र गटांमध्ये युवा फिरतील.
  • दि. १९ मे २०२३ (नववा दिवस) - निसर्ग कार्यालय, पुणे (मध्यवर्ती ठिकाण): आलेल्या अनुभवांचे, झालेल्या शिक्षणाचे आणि केलेल्या मौजमजेचे आदान प्रदान करण्यासाठी प्रदर्शन जत्रा भरवली जाईल, तसेच सहभागी युवांना प्रमाणपत्र वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील.
वैशिष्ट्ये:
  • या उपक्रमादरम्यान राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र विभागातील स्थानिक कुटुंबांमध्ये केली जाईल.
महत्वाच्या सूचना :
  • निवड झाल्यानंतर युवांनी उपक्रमाचे शुल्क रुपये १०००/- भरून आपली जागा राखीव करावी. अन्यथा प्रतीक्षा यादीतील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • सहभागी युवांनी पहिल्या दिवशी अमरावती पर्यंत येण्याचा व शेवटच्या दिवशी पुणे येथून आपापल्या स्थानिक ठिकाणी जाण्याचा सगळा प्रवास खर्च हा स्वत: करावयाचा आहे.
  • या उपक्रमादरम्यान राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आयोजक टीमतर्फे करण्यात येईल.
  • सहभागी युवा गट पश्चिम महाराष्ट्र विभागातील मान्यवर व्यक्ती, संस्था, संघटना, शासकीय यंत्रणा, शेतीआधारीत उद्योग, औद्योगिक संस्था, सामाजिक जीवन, भौगोलिक रचना, ऎतेहासिक वास्तु, स्थानिक खाद्य संस्कृती, परंपरा इ. बाबींचा अभ्यास करतील.
संपर्क :
संतोष - ९८६०७४०५६९
मनिषा -९०२२७१६९१३
रंजीत -८८३०६०५२८३