यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ मे २०२२ रोजी आयोजित ‘राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद-२०२२’ मध्ये झालेल्या ‘केंद्र शासनाची प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना आणि राज्यशासनाची महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना’, या एक दिवसीय कार्यशाळेत झालेल्या चर्चेमध्ये तज्ज्ञ व्यक्ती, आरोग्य सल्लागार यांच्याकडून आलेले, नागरिकांसाठी करावयाचे अभ्यासपूर्ण बदल, सूचना व शिफारशींचे गटनिहाय विभागणी करण्यात आली.
गटांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान सूचना व शिफारशींचे सादरीकरण करून पुन्हा चर्चा झाली व त्यानंतर सर्वांचे एकत्रित सूचना व शिफारशी एकत्रित करून सार्वजनिक आरोग्य विभाग व यशवंतराव चव्हाण सेंटर मार्फत केंद्र व राज्य शासनाला पाठवणार आहोत.
तरी सोबत जोडत असलेल्या तपशिलात दिलेल्या मुद्द्यांचे वाचन करून त्याव्यतिरिक्त उर्वरित मुद्दे मांडावयाचे असतील तर आपण आमच्या खाली दिलेल्या ईमेल वर दि.१३ जुलै,२०२२ पर्यंत (
धन्यवाद.
सुप्रिया सुळे
कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर