यशवंतराव चव्हाण यांची ओळख संयुक्त आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे उपपंतप्रधान तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री अशी आहे. देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्यक्ती किंवा संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रतिष्ठानतर्फे नामांकन मागविण्यात येत आहे. पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारासंदर्भातील तपशील चव्हाण प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुरस्काराने यापूर्वी डॉ. जयंत नारळीकर, श्री. आर. के. लक्ष्मण, सुश्री महाश्वेता देवी, भारतीय वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंग, श्री. रतन टाटा, श्री. अझीम प्रेमजी आदींना सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना किंवा भारतात नोंदणीकृत संस्थांना दिला जाईल. पुरस्कारासाठी इतर व्यक्ती किंवा इतर संस्थांकडून शिफारसी यायला हव्यात. हे नामनिर्देशन २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटर कडे प्राप्त झाले पाहिजे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट,
मुंबई ४००२१
दूरध्वनी ०२२-२२०२८५९८ आणि ईमेल हा ईमेल पत्ता स्पॅमबॉट्सपासून संरक्षित केला जात आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे.