यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ' डाॅ.कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार ' साठी शैक्षणिक विषयावरील ग्रंथ पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक विषयावरील लेखनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाते.

१ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेले शैक्षणिक विषयावरील ग्रंथ या पुरस्कारासाठी पाठवावेत. या पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२२ आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क - ८२९१४१६२१६