चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी केली तिसऱ्या वर्षासाठीची घोषणा

Fellowship Announcement

देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप'च्या तिसऱ्या वर्षासाठीची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष आणि फेलोशिपच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या फेलोशिपची घोषणा करण्यात आली.

कृषी, साहित्य, आणि शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी या फेलोशिपच्या माध्यमातून प्रेरीत केले जाणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. एम के सी एल चे चीफ मेंटॉर शिक्षण फेलोशिपचे मुख्य समन्वयक विवेक सावंत, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे सीईओ व कृषी फेलोशिपचे मुख्य समन्वयक निलेश नलावडे, साहित्य फेलोशिपचे मुख्य समन्वयक प्रा. नितीन रिंढे यावेळी उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फार्म नाशिक यांचे तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एम के सी एल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत असून कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत.

कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपसाठी आजपासून www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील. आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली २० ऑक्टोबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत तपासणी होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होईल. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार इनस्पायर साहित्य फेलोशीप’ साठी १० तर शरद पवार इनस्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण १२० फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा २६ नोव्हेंबर २०२३ रोजी केली जाईल.

तिन्ही फेलोशिपचे वार्षिक वेळापत्रक फेलोशिपच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे :-

कृषी फेलोशिप :

 • १२ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२३ - अटल इंक्युबेशन सेंटर, बारामती
 • ४ एप्रिल ते १० एप्रिल २०२४ - सह्याद्री फार्म, नाशिक
 • ऑगस्ट २०२४ पासून पुढे ४५ दिवस - संबंधित संस्थांमध्ये इंटर्नशिप

साहित्य फेलोशिप :

 • १० मार्च ते १२ मार्च २०२४ - प्रथम वर्कशॉप
 • १० जुलै ते १२ जुलै २०२४ - दुसरे वर्कशॉप
 • २३ व २८ मे २०२४ - तिसरे वर्कशॉप
 • १ व २ ऑक्टोबर २०२४ - चौथे वर्कशॉप
 • १० नोव्हेंबर २०२४ - फायनल सबमिशन

शिक्षण फेलोशिप :

 • २७, २८, २९ मे २०२४ - प्रथम कार्यशाळा
 • १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ - प्रकल्पांना भेटी
 • ८, ९, १०, नोव्हेंबर २०२४ - द्वितीय कार्यशाळा
 • २६, २७, २८ एप्रिल २०२५ - तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवाल सादरीकरण

निकाल जाहीर झाल्यानंतर दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी फेलोशिप मिळलेल्या फ़ेलोंना फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.
या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले असून फेलोशीप मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

फेलोशिप कार्यक्रम वार्षिक वेळापत्रक:

 • २५ ऑगस्ट - घोषणा , बुटकॅम्प व वर्कशॉपचे वेळापत्रक जाहीर करणे
 • २० ऑगस्ट २०२३ ते २० ऑक्टोबर २०२३ - ऑनलाईन फॉर्म सबमिशन करता येणार
 • २१ ऑक्टोबर २०२३ ते २१ नोव्हेंबर २०२३ - फॉर्म तपासणी व निवड प्रक्रिया
 • २६ नोव्हेंबर २०२३ - निकाल
 • १० डिसेंबर २०२३ - फेलोशिप प्रदान सोहळा