पूजा भडांगे

युवा साहित्य पुरस्कार
2023

मुळच्या बेळगावच्या असणाऱ्या पूजा भडांगे यांनी नोकरी साठी वयाच्या विसाव्य वर्षी आपले गाव सोडून मुंबई गाठली. सुरुवातीला अंधेरीतिला एका शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून काम पाहिले. परंतु मुंबई सारख्या महानगरीत तुटपुंजे वेतन पुरेसे नसल्याने त्यांनी आपले क्षेत्र बदलले आणि चंदेरी दुनियेत प्रवेश करण्याचे ठरवले. चित्रपट जाहिरात करणाऱ्या एका नामांकित कंपनीमध्ये त्यांनी कॉपीरायटर म्हणून काही काळ काम केले. किल्ला, डबलसीट, रंगा पतंगा, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली आणि सैराट यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी जाहिरात लिखाणाचे काम त्यांनी केले. त्यांनी शिक्षिका, कॉपीरायटर आणि त्यानंतर ठाण्याचा पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेत काही वर्षे सेवा करून लग्नानंतर पुण्यात असलेल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेत ‘सहसंपादिका’ म्हणून काही काळ काम केले.

त्यांना आधी पासूनच कवितेची गोडी होती. विरंगुळा म्हणून कविता लेखनाची सुरुवात जरी झालेली असली तरी आज त्यांच्या आयुष्यात कवितेला अनन्य साधारण महत्व आहे. छंदोबद्ध, गझल, रुबाई, अभंग, ओवी, त्रिवेणी, मुक्तछंद, बालकविता या सर्व प्रकारांत त्यांनी काव्यलेखन केले आहे. आजवर त्यांनी लिहिलेल्या अनेक कवितांची गाणी देखील झाली आहेत.

मुंबईसारख्या महानगरात जडणघडणीचा महत्त्वाचा काळ आणि हाताची कवितेची घट्ट पकड त्यामुळे जबाबदाऱ्या आणि स्वप्नापासून भरकटण्याची वेळ कधीही आली नाही, ही कवितेने आजवर दिलेली मोठी मिळकत आहे; असे त्या ठणकावून सांगतात.

पूजा यांचे कवितेने धरलेले बोट कधीच सुटू नये, ह्या सदिच्छा !

पूजा भडांगे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media