सस्नेह निमंत्रण ....
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “बढते कदम की ओर…” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन आहेत तसेच या कार्यक्रमास सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा परिसंवाद शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी, सकाळी ०९.०० ते दुपारी २.०० या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई नरिमन पोंइंट येथे संपन्न होणार आहे.
संगीत, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारीता, उद्योग, नाविण्यता तसेच समाजमाध्यमे या क्षेत्रांमध्ये जे दिव्यांग आपापल्या परीने छाप उमटवत आहेत व जे नवोदित आहेत आणि या क्षेत्रांमध्ये काहीतरी करू पाहत आहेत या सर्वांच्या प्रयत्नांना साथ मिळावी या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन चव्हाण सेंटरमार्फत करण्यात आले आहे.
दोन सत्रांमध्ये हा परिसंवाद होणार असून पहिल्या सत्रात दिव्यांगावर मात करून प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तीं योगिता तांबे- तबला व इतर वाद्य वादक, नवनीत कुलकर्णी- साहित्य, अनुजा संखे – पत्रकार व नोकरी, या कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभले आहेत.
दुसऱ्या सत्रात मिनाक्षी निकम - दिव्यांग महिला, स्वयंरोजगार, प्रकल्प, फरीदा लांबे - दिव्यांगत्व, शिक्षण आणि समावेशन, अभिजीत राऊत - वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगांचे अधिकार, डॉ. सुमित पाटील – दिव्यांग क्षेत्रात नाविण्यता, कविता मुरूगकर – सुगम्यता या विषयांवर त्या क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी संपर्क - मनीषा खिल्लारे : 90227 16913
पूर्वनोंदणीआवश्यक रजिस्ट्रेशन लिंक: https://forms.gle/9KCnirXXoMDTWgR8A