यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच सामान्य जनतेच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध असणाऱ्या कल्याणकारी योजना, कायदे व सोयी सवलती यांबद्दल जनजागृती वेगवेगळ्या उपक्रम आणि कार्यशाळेच्या माध्यमांतून विभागाच्या वतीने केली जातात. दिव्यांग प्रवर्गाला शासकीय योजनांचा थेट लाभ व्हावा तसेच या प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर सातत्याने प्रयत्न करीत आहे. ADIP (कृत्रिम अवयव व साधने वाटप) , UDID (दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र कार्ड) सारख्या केंद्र सरकारच्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध वेगवेगळे उपक्रम राबिविणे, जिल्हा आणि विभागस्तरावर कार्यशाळा आयोजित करत आहे.

याच अनुषंगाने “दिव्यांग सक्षमिकरण राज्यस्तरीय परिषद – २०२५" या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद फेब्रुवारी २०२५ महिन्यात यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत दिव्यांग विषयी योजनांसंबंधी जनजागृती आणि प्रचार व प्रसार, दिव्यांग कल्याण व्यवस्थेतील लोकसहभाग सेवापूर्तीसाठी प्रक्रिया सुलभीकरण,दिव्यांग कल्याण मंत्रालय योजनेअंतर्गत नोंदणीकृत संस्थेची सद्यस्थिती, सुधारणा व विस्तार. दिव्यांग कल्याण मंत्रालय अंतर्गत दिव्यांगांना अपेक्षित सेवा मिळतील, यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याबद्दल शिफारस करणे, केंद्र व राज्य सरकार योजनेतील सहभागी संस्था संघटना – योजनेतील अडचणी व उपाय, दिव्यांग हक्क कायदा २०१६ विविध विभागासाठीच्या तरतुदी व त्यांच्या भूमिका उदा: प्रतिबंध्यात्मक उपाय, आरोग्य, शिक्षण, कौशल्य , रोजगार, सामाजिक सुरक्षितता, अंमलबाजवणी : मंत्रालय ते ग्रामपंचायत पातळीवरील अंमलबाजवणी प्रक्रिया यांच्या अनुषंगाने सर्वंकष चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनातील विवध विभागातील अधिकारी, शाळा, आरोग्य, रुग्णालय शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, दिव्यांगांसाठी संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. तसेच सदर विषयाचा अभ्यास व अनुभव असणारे जाणकार तसेच तज्ज्ञ व्यक्ती पेपर सादर करणार आहेत.

 

अधिक माहितीसाठी संपर्क : मनिषा खिल्लारे - ०२२-२२०४५४६०, ०२२-२२८५२३४५ विस्तारित -२२४, वेळ सकाळी ११ ते ६

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
वेळ : 
10:00
ते
05:00