युवराज सोनार

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2025

युवराज सोनार यांना कलेचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला आणि चाळीसगावच्या मातीतून एक तालबद्ध सांगीतिक प्रवास सुरु झाला. वडिलांच्या वारकरी संप्रदायातील भक्तीभावातून युवराजच्या मनात बासरीबद्दलची गोडी निर्माण झाली. मागील नऊ वर्षांपासून बासरीमार्तंड पंडित विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली, पारंपरिक गुरुकुल पद्धतीने युवराज भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत आहेत. संगीतातील 'मास्टर्स' पदवी आणि संगीत विशारद पूर्ण केलेल्या युवराजने अनेक स्पर्धांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. प्रतिष्ठित 'युवा गंधर्व पुरस्कार' आणि ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया शिष्यवृत्ती ही त्यांच्या प्रतिभेचीच पावती आहे. देशातील दिग्गज महोत्सवांसह सातासमुद्रापार कॅरिबियन बेटांवरही त्यांनी बासरीचे सूर उमटवले आहेत. शास्त्रीय संगीतासह बॉलिवूड आणि फ्यूजनमध्येही त्यांचा चांगलाच हातखंडा आहे.

स्वराचार्य युवराज सोनार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media