मुंबई १८ नोव्हेंबर २०२६ : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यातील दिव्यांगांसाठी 'नाविन्यपूर्णता (Innovations), न्यू स्टार्टअप्स, सुगम्यता आणि उपजीविका (Livelihood)' या विषयावर नुकतीच एक विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, येत्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या आरक्षणासोबतच दिव्यांगांसाठीही राजकीय आरक्षणाची मागणी करणार असल्याचे ठोस आश्वासन दिले. एकूण लोकसंख्येतील दिव्यांगांची लक्षणीय टक्केवारी पाहता त्यांना राजकीय आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. चव्हाण सेंटरच्या दिव्यांग विभागाच्या २० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतानाच, यापुढे दिव्यांगांसाठी स्वतंत्र (Isolated) परिषदा घेण्याऐवजी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'समावेशित परिषदा' (Inclusive Conferences) आयोजित कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या 'सॉल्विथॉन २०२५' या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे कौतुक करत, दिव्यांगांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कौशल्य विकास व रोजगारासाठी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या परिषदेला विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती सचिन अहिर यांनी राज्य पातळीवर जिल्हा निहाय दिव्यांगांचे सर्वेक्षण करून चव्हाण सेंटरच्या सहकार्याने राज्याला एक उत्तम कृती आराखडा देण्याचा मानस व्यक्त केला, तसेच सर्व आमदारांनी आपल्या निधीचा विनियोग दिव्यांगांच्या उत्थानासाठी करावा असे सुचवले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग विभागामार्फत नवीन स्टार्टअप्सना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी यावेळी असेही सुचविले सुप्रिया सुळेंच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेले काम म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय शरद पवार यांचा सामाजिक कार्याचा वसा चव्हाण सेंटर पुढे नेत कार्यरत आहे. यासाठी पक्ष विरहित विचार करून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाठी जेजे काही करता येईल त्य त्यसाठी मी प्रयत्नशील राहील. तसेच नजीकच्या काळामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातही सर्व सुविधांनी युक्त असे 'दिव्यांग भवन' उभारण्याचा प्रयत्न करू, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रहार संघटनेचे संस्थापक मा. आमदार बच्चू कडू यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या शैलीदार भाषणात दिव्यांगांसाठी केलेल्या गेल्या १५ वर्षांच्या कार्याचा आढावा व त्यासाठी केलेल्या आंदोलनाचे विश्लेषण या ठिकाणी केले. त्याच बरोबर त्यांनी दिव्यांग व्यक्तीच्य विकासासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे पाहावे व दिव्यांगांचे अधिकार त्यांनादेखील देण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याच बरोबर त्यांनी दिव्य्नाग व्यक्तींच्या स्वयंपूर्णतेसाठी आयुष्यभर कार्यरत असणार आणि आज मी स्वतः जो काही उभा आहे राजकीय, सामाजिक दृष्ट्या दिव्यांग घटकांचा सर्वात मोठा भाग आहे हे मी कधीही विसरणार नाही याची मला जाणीव आहे. मी मक़्ज़ काम अविरतपणे सुरु ठेवणार आहे असे यावेळी उद्गार काढले. १४०० कोटींच्या बजेटपैकी १२०० कोटी मनुष्यबळावर खर्च होत असल्याने, उर्वरित २०० कोटींच्या निधीत वाढ करून दिव्यांगांच्या वैयक्तिक योजनांना चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी दिव्यांग फौंडेशनचे माजी सनदी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी समायोजित भाषण केले व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी निवृतीनंतर दिव्यांग भवनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतो याचे मला समाधान आहे व नवीन एक मॉडेल जे देशासाठी दिलेलं आहे दिव्यांग भावांच्या मध्यामात्रून असेही त्यांनी सांगितले.
यावेळी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव मा. जितेंद्र पापळकर यांनीहि आपले मनोगत मांडले. यावेळी त्यांनी उपसभापतींच्या सूचनेला दुजोरा देऊन जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याबाबतची सूचना आम्ही आधीच केलेल्या आहेत असे सांगितले. त्यांनी अकोला जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणाचे विश्लेषण याठिकाणी सांगितले, सर्वेक्षणानंतर एकसंघता व कार्यक्रमाचे नियोजन करणे सोयीचे होईल असे हि ते म्हणाले. त्याच बरोबर भविष्यात याच क्षेत्रासाठी काम करण्याचे हि आश्वासन दिले यावेळी दिव्यांग कल्याण आयुक्त मा. सत्यजित बडे यांनी या क्षेत्राचा प्राधिकृत अधिकारी म्हणून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी जेजे काही शक्य आहे ते मी करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी माहिती संकलित करून त्यांना कशा प्रकारे शासनाची मदत उपलब्ध करून देता येईल हेही सांगितले.
या प्रसंगी दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक व माजी सनदी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी पिंपरी-चिंचवड येथील दिव्यांग भवनच्या देशातील आदर्श मॉडेलबद्दल समाधान व्यक्त केले. दिव्यांग भवन फाउंडेशनचे सादरीकरण दिव्यांग भवन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अजय चाठणकर यांनी मांडले.
यावेळी जीएसटी कमिशनर नितीन पाटील यांची विशेष उपस्थितीत होती. यांनी निवृत्तीनंतर पूर्णवेळ या क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त करत, दिव्यांगांच्या विकासात मानसिक आरोग्य, शीघ्र निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
या परिषदेमध्ये विविध विषयांवर पाच सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात इनोव्हेशन, स्टार्टअप, संधी आणि दिव्यांग व्यक्ती या विषयावर दिव्यांग क्षेत्रातील तज्ज्ञ राजेश मेहेता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इनोव्हेशन सेंटर प्रमुख धनंजय भोळे आणि रोहिणी, पुणेचे संस्थापक अक्षय सरोदे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात दिव्यांग क्षेत्रातील शिक्षण, नावीन्यपूर्णता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर मॉडरेटर केतन कोठारी (कार्यकारी सल्लागार, सेंट झेविअर्स कॉलेज), प्रियंका गोडिया (सिनियर मॉनिटरिंग स्पेशालिस्ट, जय वकील फाउंडेशन), सोनाली कावेरी (विश्वस्त, टीच संस्था), निलेश छडवेलकर (अध्यक्ष, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे) आणि मिलिंद पाटील (शैक्षणिक प्रमुख, दीपस्तंभ, जळगाव) यांनी विचार मांडले. तिसऱ्या सत्रात दिव्यांग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती या विषयावर संवादक राजेश मेहेता यांच्या समवेत सॅम तारापोरवाला (कार्यकारी संचालक, सेंट झेविअर्स कॉलेज), साईदर्शन भगत (शास्त्रज्ञ, C-DAC, मुंबई), प्रिती रोहरा (मुख्य सुलभता अधिकारी, बॅरियरब्रेक टीम) आणि तेजस रेळेकर (तंत्रज्ञान तज्ज्ञ) यांनी सहभाग घेतला. चौथ्या सत्रात दिव्यांग क्षेत्रातील सुलभता, पायाभूत सुविधा आणि नवनिर्मिती या विषयावर संवादक अक्षय सरोदे यांच्या समवेत अभिजित मुरुगकर, सौरभ चौधरी आणि निलेश सिंगीत या सुलभता तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात दिव्यांग क्षेत्रातील इनोव्हेशन, स्टार्टअप आणि CSR संधी या विषयावर NCPEDP, दिल्लीचे संचालक अरमान अली यांच्या संवादातून इंडसइंड बँकेचे CSR प्रमुख सुमित चव्हाण आणि सुलभता तज्ज्ञ अभिजित मुरुगकर यांनी दिव्यांग क्षेत्रातील नवकल्पना, स्टार्टअपना आर्थिक पाठबळ आणि CSR सहकार्याच्या संधींवर विचार मांडले.
कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार फुले लिखित 'दिव्यांगांसाठी सर्व काही' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजय कान्हेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मनीषा खिल्लारे यांनी आभार मानले. विभागाच्या प्रमुख दीपिका शेरखाने व चव्हाण सेंटरच्या टीमने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले, ज्यात सेंट झेवियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला आणि 'टीच' (TEACH) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.



