ऋचिका खोत

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2025

लेखन, दिग्दर्शन आणि गायन अशा विविधांगी छटांनी ऋचिका खोत यांचं व्यक्तिमत्व बहरत आहे. ललित कला केंद्रातून नाट्य विषयात सुवर्णपदकासह पदवी संपादन केलेल्या ऋचिका यांनी मागील १२ वर्षांपासून नाट्यक्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. लोककथा, आख्यायिका आणि ग्रामीण संस्कृतीचा शोध घेत त्यांचं संवर्धन करणं हाच त्यांचा ध्यास आहे. 'जिकनी' सारख्या डॉक्यु-म्युझिकलच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी मुलांचे अनुभव जगासमोर आणले. 'किर्तावणी' असो वा 'बांधारीचे बाय गं', त्यांच्या या सांगीतिक नाटकांनी महाराष्ट्रभर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिऍलिटी शोमधील उपविजेता म्हणून त्या घराघरात पोहोचल्या. केवळ सादरीकरणच नाही, तर 'थिएटर इन एज्युकेशन'च्या माध्यमातून त्या भावी पिढीलाही घडवत आहेत. ललित कला केंद्र आणि भालजी पेंढारकर केंद्रात त्या नाट्य अध्यापनाचे काम करतात. त्यांना 'इंडियन ऑस्ट्रम थिएटर कंपनी'ची प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली तसेच त्यांच्या 'मंजिरी' लघुपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. अस्सल मातीतील सुरांना आधुनिक रंगमंचावर रुचिका यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

रंगभूमीवरचा चैतन्यमयी आविष्कार आणि लोककलेचा नवा श्वास असणाऱ्या ऋचिका खोत यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media