जयेश टोपे

युवा उद्योजक पुरस्कार
2024

पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या जयेश यांनी महिंद्रा येथे त्यांच्या करिअरची सुरवात केली. आयकॉनिक THAR च्या निर्मितीत त्यांनी प्रोजेक्ट मेनेजरची भूमिका बजावली. पण जयेश यांची स्वप्ने तिथेच थांबली नाहीत.

जयेश यांची उद्योजक होण्याची सुरवात निकोला मोटर्स व व्हेजिटो फार्म्स या कंपनी पासून झाली. भारत जेव्हा ईव्हीचे स्वप्न पाहत होता तेव्हा जयेश यांनी हाय-स्पीड स्मार्ट इलेक्ट्रिक बाइक्स बनवायल सुरवात केली होती. व्हेजिटो फार्म्सच्या माध्यमातून हाय टेक शेती करण्याकडे त्यांनी लक्ष दिले.

२०२० मध्ये, त्यांनी रेव्हॅम्प मोटो या संस्थेची स्थापना केली. या कंपनीचे ते सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. रेव्हॅम्प मोटो हे आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. शार्क tank सारख्या प्रतिष्ठित शो मध्ये देखील त्यांच्या कंपनीने सहभाग नोंदवला होता. लोकांसमोरील आव्हानांना तोंड देऊन रेव्हॅम्प मोटो भारतातील शहरी वाहतुकीत क्रांती घडवत आहे. तसेच मॉड्यूलर युटिलिटी प्लॅटफॉर्मने सुसज्ज असलेल्या नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक टू-व्हीलरद्वारे सूक्ष्म-उद्योजकांनाही मदत करत आहे. त्यांचे प्रमुख उत्पादन, आरएम बडी २५, मॉड्यूलर युटिलिटी सिस्टम आणि स्वॅपेबल बॅटरी सारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येते. जयेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेव्हॅम्प मोटोच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील एक महत्वाचे परिवर्तन घडवून आणले आहे.

देशाच्या ग्रीन आणि स्मार्ट भविष्याच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचलणारे जयेश टोपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media