दिव्यप्रभा भोसले

इनोव्हेटर पुरस्कार
2022

दिव्यप्रभा भोसले यांचे शिक्षण BSc. Animal Husbandry या विद्या शाखेतून झाले. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी नंदन दुध डेअरी येथे इंटर्नशिप करत असताना दुधात प्रोटीन कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. प्रोटीन कमी असलेले दूध डेअरी मध्ये रिजेक्ट केले जाते. त्त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होतो आणि हेच दूध लहान मुलांच्या आरोग्यावर देखील परिणाम करते. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करत असताना उपाय म्हणून “प्रोटीन बार” ही संकल्पना उदयास आली व वसुवर्धिनी कॅटल फीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली.

या कंपनीच्या अंतर्गत होणाऱ्या संशोधनामुळे दुधाचे उत्पादन ३२ टक्क्यांनी वाढले तर दुधातले प्रोटीन कंटेंट १६ टक्क्यांनी आणि दुधातले फॅट कन्टेन्ट हे 24 टक्क्यांनी वाढले आहे. बारामती येथील अटल इंक्युबेशन सेंटर यांचे सहकार्य दिव्यप्रभा यांना नेहमीच लाभते.

या संशोधनाला शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एग्रीकल्चर मिळाली आहे. तसेच स्टार्टअप इंडिया आयोजित स्मार्ट आयडियाथॉन 2022 टॉप 30 मध्ये निवड व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत 25 लाखाचे नॉन रिफंडेबल फंडिंग दिव्यप्रभा यांच्या संशोधनाला मिळाले आहे.

त्यांच्या या संशोधनाचा फायदा हा देशातील सर्व दूध उत्पादक शेतकरी, दूध डेअरी यांना व्हावा आणि दिव्यप्रभा भोसले यांच्या हातून अनेक विविध संशोधन घडावे, या सदिच्छा !

यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media