चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांचा पुढाकार
मुंबई, दि.२३ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र ठाणे, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ' शोध आनंदी जीवनाचा : मानसिक आरोग्य कायदा २०१७' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरचे विजय कान्हेकर यांनी हि माहिती दिली. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेची संकल्पना ' सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि सर्वांचे कल्याण ' अशी आहे.
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून हि कार्यशाळा होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे तज्ज्ञ तसेच मानसिक आरोग्य तज्ज्ञ या कार्यशाळेत मत मांडणार आहेत. ही कार्यशाळा फेसबुक आणि युट्युबवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ता तसेच विषयाशी संबंधित विद्यार्थी, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमातील अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी तसेच मनोविकार तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.