मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मुंबई मॅनिफेस्टोची सुरवात करण्यात आली. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांवर या podcast च्या माध्यमातून विविध मान्यवरांशी चर्चा केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये शिक्षण, पर्यावरणविषयक चिंता, सार्वजनिक वाहतूक आणि शहरी नियोजन यासह विविध विषयांचा समावेश आहे. मुंबई मॅनिफेस्टो अंतर्गत शहराच्या भविष्याची कल्पना करताना, पायाभूत सुविधा आणि सेवांचे व्यवस्थापन करताना नागरिक आणि सरकार या दोघांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा अभ्यास केला जाणार आहे.
मुंबई मॅनिफेस्टो च्या माध्यमातून मुंबईकरांचा आवाज ऐकला जाईल आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जातील तसेच शहरातील समस्या आणि संभाव्य उपायांची चर्चा केली जाईल. मुक्त संवाद आणि गंभीर विश्लेषणाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे भविष्य सुधारण्यासाठी मदत करत आहे.