मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ‘आंबा महोत्सवाचे’ आयोजन २१ एप्रिलपासून चव्हाण सेंटर, मुंबई येथे करण्यात आले आहे, अशी माहिती सेंटरकडून देण्यात आली.
शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा, या उद्देशाने या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हापूस, केशर, पायरी, लंगडा तोतापुरी, रायवळ याबरोबर अनेक जातीचे आंबे उपलब्ध असतील. २१ ते २९ एप्रिल दरम्यान असणाऱ्या या महोत्सवास मुंबईकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन सेंटरकडून करण्यात आले आहे.