मुखेड -कमळेवाडी सारख्या ग्रामीण भागात जेथे राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी ज्ञानार्जन करताना त्यांच्या बोली भाषेचा वापर करून त्यांना शिक्षण देणारे प्रा शिवाजी अंबुलगेकर हे अनन्य शिक्षक आहेत त्यांची कार्यप्रणाली आणि कर्तव्य निष्ठा हे निश्चित नव्या शैक्षणिक व्यवस्थेला नवी प्रेरणा देणारी आहे.शाळा किती नावाजलेली आहे यापेक्षा शिक्षक किती धडपड करणारे व कृतीशिल आहेत यावर खूप काही अवलंबून आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नांदेड जिल्हा कार्यालयाच्या वतीने शिवाजी आंबुलगेकर यांना राज्यस्तरीय " अनन्य सन्मान" मिळाल्याबद्दल प्रसिद्ध कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र कार्यकारिणीच्या पुढाकाराने हा सोहळा घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीचे जिल्हा लेखाधिकारी व्यंकटराव पाचंगे होते यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा यशपाल भिंगे, गोदावरी अर्बन बँकेच्या संस्थापिका राजश्री पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ वृषाली किन्हाळकर यांनी प्रा शिवाजी अंबुलगेकर यांच्या शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचा गुणगौरव करताना त्यांनी आपल्या शाळेत जे नवोपक्रम राबविले ज्या व्यवस्थेतून कमळेवाडी येथील विद्यार्थी ज्ञानार्जन करतात तेथे बोलीतून त्यांनी राबविले. हे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. शाळा किती मोठी यापेक्षा शिक्षक मग ते कोणत्याही शाळेतील का असेना ते विद्यार्थी कसे घडवितात यावर खूप काही अवलंबून आहे असे सांगितले.
मराठवाडी बोली भाषा संवर्धन चळवळीचे संकल्पक प्रसिद्ध कवी केशव खटिंग यांनी प्रा शिवाजी आंबुलगेकर घेतलेली मुलाखत लक्षवेधी ठरली.त्यात अनुवादाची आनंदशाळा, माझ्या गावचा भूगोल आणि वाचनसंस्कूती या शैक्षणिक प्रयोगाचे वेगळेपण अधोरेखित करताना शिवाजी आंबुलगेकर पुढे म्हणाले की,"सर्वांना अत्युच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे.याकामी शैक्षणिक संकल्पना सुस्पष्ट असणारे समर्पित शिक्षक मोलाची भूमिका बजावतात.राष्ट्र निर्माण करणारे मनुष्यबळ शाळेतून पर्यायाने खेडयापाडयातून येते.केवळ चांगले शिक्षक न मिळाल्याने आजची पिढी निराशेच्या सावटाखाली जगते आहे.आजच्या सामाजिक विषमतेला हेच वातावरण काही अंशी कारणीभूत आहे.अशा आव्हानात्मक परिस्थितीत अराजकता थोपवण्याचे बळ द्रष्टया शिक्षकांत आहे.माझे अष्टपैलू शिक्षक नाना गायकवाड(कंधार),सगरोळीकर मैडम,अरविंद देशमुख (सगरोळी),डी एम कतराळे(लातूर) यांच्यामुळे मी घडत गेलो याचा आवर्जून उल्लेख करताना शाळेतील वाचन प्रकल्पास प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांचे त्यांनी ऋण व्यक्त केले या वेळी , प्राचार्य डॉ अशोक गवते, नरसिंगराव आठवले,प्रा.संदिप देशमुख,सेवानिवृत्त बिईओ एम आर राठोड इंजि.रोहिणी शिवाजी वडजे,साहित्यिक देविदास फुलारी,जगन शेळके,शिवा कांबळे,प्रा पूथ्वीराज तौर, लेखक प्रा महेश मोरे, हरीहर धूतमल,डॉ राम तायडे, कोनाळे सर आदि मान्यवर मंडळी हजर होती.प्रारंभी प्रास्ताविक शिवाजी गावंडे यांनी केले डॉ श्रीराम गव्हाणे यांनी संचलन केले व पंडीत पाटील यांनी आभार मानले.